प्रभाग 13 ब मध्ये शिक्षण, अनुभव आणि निस्वार्थी सेवेतून उभा राहणार ‘बदलाचा प्रवाह’ — सुनील महाजनांनी दाखवली नवी दिशा!”
1 min read

प्रभाग 13 ब मध्ये शिक्षण, अनुभव आणि निस्वार्थी सेवेतून उभा राहणार ‘बदलाचा प्रवाह’ — सुनील महाजनांनी दाखवली नवी दिशा!”

Loading

प्रभाग 13 ब मध्ये शिक्षण, अनुभव आणि निस्वार्थी सेवेतून उभा राहणार ‘बदलाचा प्रवाह’ — सुनील महाजनांनी दाखवली नवी दिशा!”

अमळनेर प्रतिनिधी – ईश्वर महाजन

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग 13 ब मध्ये एक वेगळी, विचारप्रवर्तक आणि जनतेच्या मनाला थेट भिडणारी उमेदवारी चर्चेत आहे. बीए, एमए, SET परीक्षा उत्तीर्ण व तब्बल 21 वर्षांच्या पोलिस सेवेत कायद्याचा सखोल अभ्यास करून अनुभव सिद्ध केलेले सुनील दयाराम महाजन आता राजकीय सेवेत नवीन प्रवाह निर्माण करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.

“आपल्या समस्या कधी सुटणार?” हा प्रश्न वर्षानुवर्षे कायम राहण्याचे एकच कारण — योग्य, अभ्यासू आणि निस्वार्थी नेतृत्वाचा अभाव. हेच वास्तव सुनील महाजन यांनी स्पष्ट शब्दांत मांडत जनतेसमोर एक नवा मार्ग दाखवला आहे.

सुनील महाजन म्हणतात, “राजकारणात येऊन संपत्ती जमवायची किंवा पदाचा मान वाढवायचा हा हेतू कधीच नव्हता. मी पदाला नव्हे, तर परिवर्तनाला प्राधान्य दिले आहे. सामान्य माणसाच्या समस्या, त्याचे संघर्ष, त्याचे दुःख — हे मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्या वेदना कमी करण्यासाठी मीच पाऊल टाकलं नाही, तर कोण टाकणार?”

प्रभागातील लहानसहान समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. नागरिकांना दारोजागणारी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, अडचणीचे रस्ते, सरकारी योजनांचा लाभ न मिळणारी कुटुंबे — ही समस्या सुटत नाहीत कारण त्या सोडवण्याची इच्छाशक्ती आणि कायदेशीर कसब असलेले नेतृत्व कमी आहे.

त्यामुळेच पोलिस खात्यातील सुरक्षित नोकरी, चांगला पगार, मानाचा वर्दीचा दर्जा — हे सर्व मागे ठेवत सुनील महाजनांनी जनतेच्या सेवेला प्राधान्य दिले. समाजहित, विकासाची प्रामाणिक तळमळ व न्याय्य दृष्टिकोन या विचारांसह ते मैदानात उतरले असून प्रभागात त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

“मी जमिनीवरूनच मोठा झालो… आजही जमिनीवर आहे आणि आयुष्यभर जनतेच्या जाणीवेवर राहणार आहे,” असे सांगत सुनील महाजनांनी स्पष्ट केले की ते फक्त निमित्त आहेत — खरी सुधारणा, खरा बदल जनतेच्या साथीतूनच शक्य आहे.

प्रभाग 13 ब मध्ये आता एकच चर्चा —
“राजकारणासाठी नव्हे… परिवर्तनासाठी आलेला नेता!”

आगामी निवडणुकीत सुनील महाजन यांची उमेदवारी प्रभागातील राजकीय समीकरणांना नवा आकार देणार आहे, हे निश्चित!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *