माजी सैनिक रामराव देशमुख “ग्लोबल पीस अम्बासॅडर” ने सन्मानित* *डिप्लोमॅटीक मिशन ग्लोबल पीस व सैनिक फेडरेशन कडून माजी सैनिकांचे मुंबईत सन्मान*
![]()
*माजी सैनिक रामराव देशमुख “ग्लोबल पीस अम्बासॅडर” ने सन्मानित*
*डिप्लोमॅटीक मिशन ग्लोबल पीस व सैनिक फेडरेशन कडून माजी सैनिकांचे मुंबईत सन्मान*
*अकोला* – खामगांव येथील माजी सैनिक,स्टेट बॅंकेचे माजी रोखपाल व सैनिक फेडरेशनचे नवनिर्वाचित बुलढाणा जिल्हाध्यक्ष रामराव बाप्पू देशमुख,गारडगावकर यांना मुंबईतील एका खास समारंभात ग्लोबल पीस अम्बासॅडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.निवृत्तीनंतर सैनिक फेडरेशन मधून माजी सैनिकांच्या कल्याणासाठी व ईतर सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या सर्व दलांच्या प्रभावी माजी सैनिकांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये सहभागी माजी सैनिकांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.रामराव बाप्पू देशमुख यांची नुकतीच बुलढाणा जिल्हा सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षपदावर निवड झाली असून त्यानंतर लगेच त्यांना प्राप्त हा दुसरा बहूमान आहे.
श्री रामराव देशमुख यांचा माजी सैनिकांच्या कल्याण कार्यक्रमासोबतच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये निरंतर सहभाग असून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे सुध्दा ते बुलढाणा जिल्हा संघटन प्रमुख आहेत.समाजात प्रस्थापित स्नेहशील संबधामुळे एक समाजशील व्यक्तिमत्व म्हणेन ते परिचित आहेत.त्यांना प्राप्त बहूमानाबध्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

