चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव
1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरात राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी:
आज दि. ०७/११/२०२५, शुक्रवार रोजी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त, चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी केले.
सकाळी ९.३० वाजता शाळेचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विशेष विद्यार्थी एन. इ. एस. हायस्कूल ग्राऊंड, पारोळा येथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब, पारोळा, गटशिक्षणाधिकारी, पारोळा, पोलीस कर्मचारी, पारोळा पोलीस स्टेशन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी व कर्मचारी आणि पारोळा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी देखील उपस्थित होते.
कार्यक्रमात आर.एल. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मनिष करंजे सरांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. याशिवाय, कार्यक्रमाच्या शेवटी श्री. राजपुत सरांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव आणि एकात्मतेचा संदेश दृढ करण्याचा प्रयत्न केला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *