शैला बैसाणे यांना ‘राष्ट्र गौरव 2025’ — नवकल्पनात्मक शिक्षणाचा सन्मान
![]()
शैला बैसाणे यांना ‘राष्ट्र गौरव 2025’ — नवकल्पनात्मक शिक्षणाचा सन्मान
अमळनेर प्रतिनिधी : डिजिटल प्रेस ऑफ इंडिया आणि ISO 9001:2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित “राष्ट्र गौरव पुरस्कार 2025” हा भव्य पुरस्कार सोहळा मलकापूर येथे पार पडला. राज्यभरातून आलेल्या पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, कला, वैद्यकीय, उद्योजकता, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा या वेळी सन्मान करण्यात आला.
एकूण 768 प्रस्तावांमधून निवड करून 156 मान्यवरांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार 2025’ तर 118 शिक्षकांना “नॅशनल आयकॉन अवॉर्ड” देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. अनिल खर्चे होते तर उद्घाटन ब्रह्मानंद जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये संजय काजळे, धनश्री काटीकर पाटील, उद्योजक बंडूभाऊ चवरे यांचा समावेश होता. उपक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
याच कार्यक्रमात श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (उपशिक्षिका – नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली–रंजाणे) यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल मित्रपरिवार व पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

