प्रताप’ मध्ये वंदे मातरम व विद्यार्थी दिन साजरा* : ———————————————– ● करिअर कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम ● प्र.प्राचार्य डॉ.जाधव,डॉ.कल्पना पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण ● बँकिंमचंद्र चॅटर्जी,डॉ.आंबेडकर, डॉ.सी व्ही रमण यांना अभिवादन ● विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
![]()
*’प्रताप’ मध्ये वंदे मातरम व विद्यार्थी दिन साजरा* :
———————————————–
● करिअर कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम
● प्र.प्राचार्य डॉ.जाधव,डॉ.कल्पना
पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण
● बँकिंमचंद्र चॅटर्जी,डॉ.आंबेडकर,
डॉ.सी व्ही रमण यांना अभिवादन
● विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
———————————————
अमळनेर : खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील करिअर कौन्सिलिंग सेंटर मध्ये ०७ नोव्हेंबर रोजी ‘वंदे मातरम’ या प्रेरणादायी व ऐतिहासिक गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे गीताचे लेखक बँकिंमचंद्र चॅटर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले याचप्रमाणे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रतापसिंग हायस्कूल, सातारा येथे प्रथम प्रवेश घेतला आणि जगास एका विद्वानाचा परिचय झाला म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्तुत प्रसंगी भारतरत्न डॉ.सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी बँकिंमचंद्र चॅटर्जी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.सी व्ही रमण यांच्या कार्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी डॉ.आर सी सरवदे,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.माधव भुसनर,डॉ.विलास गावित,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,प्रा.विजय साळुंखे,डॉ.किरण भागवत,प्रा.रोहन गायकवाड, डॉ.बालाजी कांबळे,दिलीपदादा शिरसाठ, पराग रवींद्र पाटील,गोपाळ पाटील,गिरीश पाटील,धिरज चौधरी, आकाश कोळी,नंदू पाटील,योगेश चिंचोरे,अतुल धनगर,अनिकेत अहिरे,दिनेश चिंचोरे आदी उपस्थित होते.


