साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हरित सेने अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन
1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हरित सेने अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हरित सेने अंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन

अमळनेर प्रतिनिधी
:साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 7 /11 /25 वार शुक्रवार रोजी वंदे मातरम ह्या राष्ट्रगीतास दिडशे वर्षे पूर्ण झाल्या निमित्त व हरित सेने अंतर्गत दोघांचे औचित्य साधून वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे मॅडम .यांनी केले . कार्यक्रम प्रसंगी अमळनेर तालुक्याचे तहसीलदार माननीय रुपेश कुमार सुराणा,डीवायएसपी माननीय श्री,विनायक कोते साहेब व पोलीस निरीक्षक माननीय दत्तात्रय निकम महंत ईश्वरचंद्र जी महाराज उपस्थित होते .सर्व मान्यवर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता दीपक बोरसे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला . कार्यक्रमाच्या वेळी हरित सेनेच्या शिक्षिका सौ .वैद्य मॅडम व हरित सेनेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या . सदर वृक्षारोपण साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले वृक्षारोपणच्या अगोदर सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम झाला . संस्थेचे अध्यक्ष मा . आबासाहेब श्री . हेमकांत पाटील .व सचिव श्री . दादासाहेब संदिप घोरपडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *