सि.रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कमावले तृतीय स्थान
1 min read

सि.रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कमावले तृतीय स्थान

Loading

सि.रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कमावले तृतीय स्थान

सविस्तर बातमी:
धरणगाव  प्रतिनिधी – कळमसरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सि. रा. चौधरी हायस्कूल, किनोदच्या मुलींनी काल नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीड़ा संकुलात पार पडलेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 4×100 मीटर रिले दौडीत तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला.

या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक क्षितिज संजीवकुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या मुलींच्या मेहनतीला बक्षीस मिळाले आहे.

मुख्याध्यापकांनी सांगितले की, या यशामुळे केवळ शालेय क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर मुलींच्या आत्मविश्वासातही वाढ झाली आहे. तसेच भविष्यातील स्पर्धांसाठी मुलींना प्रोत्साहन देणे व क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे हे शाळेचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *