“करुणेचा संदेश शाळांपर्यंत — अमळनेरमध्ये करुणा क्लबची एकदिवसीय सहविचार सभा”
![]()
“करुणेचा संदेश शाळांपर्यंत — अमळनेरमध्ये करुणा क्लबची एकदिवसीय सहविचार सभा”
अमळनेर प्रतिनिधी
स्व. सौ. पद्मावती नारायणदास मुंदडा विद्यालयात दिनांक 5 नोव्हेंबर, बुधवार रोजी अंतरराष्ट्रीय करुणा क्लब, चेन्नई यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील सर्व शालेय करुणा क्लब संघटक शिक्षकांची एकदिवसीय सहविचार सभा घेण्यात आली. या सभेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये करुणा, संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि प्राणिमात्रांविषयी दया भाव निर्माण करण्यासाठी करुणा क्लब उपक्रमांची दिशा ठरवणे हा होता.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य करुणा क्लब प्रसार व प्रचारक श्री. भूपेशजी चारण (जोधपूर, राजस्थान) विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर विंचूरकर यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते श्री. भूपेशजी चारण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी करुणा क्लब जळगाव जिल्हा संघटक श्री. दिनेशजी पालवे यांनी करुणा क्लब शाळांमध्ये वर्षभर राबवू शकणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी खालील उपक्रमांना विशेष महत्त्व दिले :
प्राण्यांवरील प्रेम व संरक्षण उपक्रम,
प्लास्टिकबंदी, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन,
वाचन संस्कृती आणि मूल्यशिक्षण कार्यक्रम
,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक जबाबदारी
“करुणा क्लब ही फक्त उपक्रमाची संकल्पना नसून विद्यार्थ्यांच्या चारित्र्यविकासाची आणि मानवी मूल्यांची प्रत्यक्ष शाळा आहे,” असे मत पालवे सरांनी व्यक्त केले.
आभार प्रदर्शन करुणा क्लब शिक्षक श्री. गोकुळ बोरसे यांनी केले.
सभेला करुणा क्लबचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी श्री. भूपेशजी चारण (राजस्थान), प्रभाकर विंचूरकर सर, गोकुळ बोरसे सर, दिनेशजी पालवे सर, उमेश काटे, प्रदीप चौधरी, नरेंद्र बाळू पाटील, योगेश पाटील, योगेश सुर्यवंशी तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.


