स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर महेश पाटील यांची निवड
1 min read

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर महेश पाटील यांची निवड

Loading

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर महेश पाटील यांची निवड

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांची स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे युवक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून मा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार तसेच मा. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवड मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

या मंडळाच्या जाहीर केलेल्या यादीत युवक काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष महेश पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, आगामी उमेदवार निवड प्रक्रियेत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

महेश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना पक्षाशी जोडण्याचे व संघटन बळकटीकरणाचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे काँग्रेसच्या युवक पिढीला नवा उत्साह व प्रेरणा मिळाली आहे.

महेश पाटील यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *