अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, वा. ना. आंधळे यांचा समावेश
1 min read

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ ला वितरण प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, वा. ना. आंधळे यांचा समावेश

Loading

 

अहिरानी साहित्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा : २३ ला वितरण
प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रभाकर शेळके, ज्ञानेश्वर भामरे, डॉ. सुमती पवार, ज्ञानेश दुसाने, वा. ना. आंधळे यांचा समावेश

“काव्य, कथा, कादंबरीस सन्मान – अहिराणी साहित्य परिषदेचे २०२४-२५ पुरस्कार जाहीर”

धुळे प्रतिनिधी :- अहिराणी बोलीचा प्रसार व संवर्धन या उद्देशाने स्वर्गीय आमदार प्राचार्य सदाशिवराव माळी यांनी अहिराणी साहित्य परिषदेची स्थापना केली. गेल्या २० वर्षांपासून अहिराणी साहित्यात कार्यरत अहिराणी बोलीतून लिहिणाऱ्या विविध साहित्य प्रकारातील लेखकांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याच्या हेतून दरवर्षी विविध दात्यांच्या पुढाकाराने साहित्याचे पुरस्कार देण्याची परंपरा सातत्याने सुरू आहे. अहिरानी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे प्रतिष्ठेचे अहिरानी साहित्य लेखन क्षेत्रातील कथा, काव्य,कादंबरी, अनुवाद,ललित साहित्य लेखन आदी साहित्य क्षेत्रातील कलाकृतींना सन २०२४-२५ या वर्षाच्या विविध पुरस्कारांची घोषणा साहित्य परिषदेच्या कार्यकारणी सभेच्या सभेत पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश राठोड यांनी केली. कादंबरी, ललित गद्य, काव्य लेखन, कथासंग्रह, अनुवाद आदी साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर केलेत. याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.भगवान पाटील हे होते. त्यांच्या उपस्थितीत वरील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुरस्कारांचे वितरण धुळे येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते समारंभ पूर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती कार्यकारणी सदस्य रवींद्र वाणी यांनी दिली.
अहिरानी साहित्य परिषदेने पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील अहिराणी बोलीत लेखन करणाऱ्या लेखकांकडून पुस्तके मागविली होती. त्यास भरघोस प्रतिसाद लाभला. प्राप्त पुस्तकांमधून निवड करण्यासाठी परिषदेने ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक प्रा. रमेश राठोड यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती नेमली त्यात प्रा.फुला बागूल, रवींद्र वाणी, प्रकाश महाले, रत्ना पाटील यांचा समावेश होता.
निवड समितीने एकमताने निवड केली. कादंबरी विभाग कै.अँड. झेड्. बी. पाटील,यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राचार्य. डॉ. संजीव गिरासे ( म्हसदी ) यांच्या ‘वडांग’ या कादंबरीस जाहीर करण्यात आला. कै. प्राचार्य भालचंद्र चुडामण साळुंखे व श्रीमती सीताबाई शंकर खलाणे, यांच्या स्मरणार्थ काव्य लेखन विभागात प्रभाकर शेळके ( फागणे ) यांच्या ‘तिनि दुनिया, प्राचार्य. डॉ. सुमती पवार ( नाशिक )यांच्या ‘हिरिदना बोल’ या कवितासंग्रहांना, कथासंग्रह विभागात कै. प. पू. ब. ना. कुंभार गुरुजी यांच्या स्मरणार्थ तर प्रा. डॉ. ज्ञानेश दुसाने ( पुणे) यांच्या ‘भवरा’ या कथासंग्रहास शिवाय ललित गद्य विभागात कै. पी.जी.पाटील यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर भामरे ( वाघाडी ता. शिरपूर ) यांच्या ”वाघाडीना शानोभो, पुस्तकास तसेच अनुवाद विभागात कै. सुरेश गंगाराम पाटील यांच्या स्मरणार्थ ‘बा तथागत’ प्रा. वा. ना आंधळे ( एरंडोल ) लिखित पुस्तकांना पुरस्कार जाहिर करण्यात आलेत.
सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यांकांचे जेष्ठ साहित्यीक, प्रकाशक गोकूळ बागुल, प्रा. एच. एन. महाजन, पी.सी. पाटील, सुमनताई महाले, बी. के. सनेर, कार्यकारीणी मंडळाने व जेष्ठ साहित्यीकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *