“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती सोहळा निंब येथे उत्साहात – अन्नदान, रक्तदान, भव्य मिरवणूक आणि मान्यवरांचा गौरव!”
1 min read

“लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती सोहळा निंब येथे उत्साहात – अन्नदान, रक्तदान, भव्य मिरवणूक आणि मान्यवरांचा गौरव!”

Loading

 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती सोहळा निंब येथे उत्साहात – अन्नदान, रक्तदान, भव्य मिरवणूक आणि मान्यवरांचा गौरव!”

अमळनेर प्रतिनिधी – भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त निंब गावात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. ३० ऑक्टोबर रोजी संपूर्ण गावाने एकत्र येऊन अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले, जिथे समाजातील सर्व घटकांनी सहकार्याने पुण्यकार्याला गौरव दिला. ३१ ऑक्टोबर सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित महा रक्तदान शिबिरात गावातील ४० तरुणांनी उत्साहाने रक्तदान केले आणि त्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन आदरासह सन्मानित केले गेले.

संध्याकाळी बसस्टँड चौकात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फलक अनावरण सोहळा पार पडला, तर विठ्ठल मंदिर चौकात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व मनोगत कार्यक्रम भावनिक व प्रेरणादायी ठरला. या प्रसंगी उपस्थित होते – दादासो डॉ. राधेश्याम चौधरी निंबकर (भाजपा जिल्हाध्यक्ष, पश्चिम विभाग जळगाव), नामदार भाऊसो श्री गुलाबरावजी पाटील (पालकमंत्री जळगाव) यांचे सहाय्यक श्री नवलसिंगराजे पाटील, नानासो कृषिभूषण प्रकाश भुता पाटील, दादासो श्री नरेंद्र पाटील (सभापती कृ.उ.बा. समिती चोपडा), जीभाऊसो श्री भागवत पंडित पाटील पाडळसरे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट), बापुसो श्री गोपाल चौधरी निंबकर (जि.प. सदस्य जळगाव), दादासो श्री महेश पाटील (उत्तर महाराष्ट्र भा.का. मो. सरचिटणीस), आप्पासो श्री पुंडलिक शंकर पाटील निंबकर (आदर्श ग्रामविकास अधिकारी पाटोदा), बापुसो श्री अनिल चौधरी (मुख्याध्यापक नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब) आणि डॉ. साहिल भास्कर चौधरी निंबकर (वैद्यकीय अधिकारी PHC मारवड).

सायंकाळी गावभर भव्य मिरवणूक पार पडली; जयघोष, देशभक्तीपर गीत आणि तरुणांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले. समस्त गुर्जर समाज निंब आणि गावातील तरुण मित्रमंडळींच्या सहकार्याने हा जयंती सोहळा उत्साह, आनंद आणि प्रेरणादायी अनुभवाने परिपूर्ण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *