चर्मकार विकास संघ आयोजित वधू-वर व पालक परिचय मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — ५३५ वधू-वरांचा परिचय संपन्न”
1 min read

चर्मकार विकास संघ आयोजित वधू-वर व पालक परिचय मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — ५३५ वधू-वरांचा परिचय संपन्न”

Loading

चर्मकार विकास संघ आयोजित वधू-वर व पालक परिचय मेळाव्यास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — ५३५ वधू-वरांचा परिचय संपन्न”

 

जळगाव (प्रतिनिधी) : चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य व परराज्यातील वधू-वरांच्या प्रथम पसंतीचा तृतीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळ, जळगाव येथे अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. समाजबांधवांचा या मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून ५३५ वधू-वरांनी आपला परिचय सादर केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय नामदार श्री. संजयजी सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. राजू मामा भोळे, संस्थापक प्रदेशाध्यक्ष श्री. संजयजी खामकर, माजी महापौर व जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. विष्णूभाऊ भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष श्री. दीपकभाऊ सूर्यवंशी, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, डॉ. संदीप भारूळे, सरपंच श्री. राजेश वाडेकर, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र बाविस्कर, ऊर्जा विभागाचे निरीक्षक श्री. गणेशजी सुरडकर, प्रदेश उपाध्यक्ष श्री. विश्वनाथजी सावकारे, राज्यकारणी सदस्य श्री. संजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष अॅड. डॉ. अर्जुन भारुडे,उप कार्यकारी अभियंता श्री.महेश तांबे, जिल्हा सचिव प्रा. धनराज भारुडे, प्रदेश सहसचिव अॅड. चेतन तायडे, श्री. वसंतराव नेटके, प्रकाश रोजतकर, काशीनाथ इंगळे, श्री.रामदास सावकारे,श्री.अशोकमामा सावकारे कमलाकर ठोसर, नगरसेविका सौ. सुरेखाताई तायडे, रामदास गाडेकर,सुखदेव काटकर,श्री. खंडू पवार, श्री. विजय पवारसाहेब, श्री. मनोजभाऊ सोनवणे, श्री. कैलास वाघ, श्री. अशोक भारुळे, श्री. रतीराम सावकारे, श्री.गजानन दांडगे,श्री.निवृत्ती सूर्यवंशी,श्री.केशव ठोसरे,,श्री. संदीप ठोसर तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
मेळाव्याचे प्रास्ताविक श्री. संजयजी खामकर व डॉ. संजय भटकर यांनी केले. या प्रसंगी समाजाच्या विवाह क्षेत्रातील आधुनिकतेच्या दिशेने एक पाऊल म्हणून ‘ऋणानुबंध’ या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या मेळाव्यात विवाहित, घटस्फोटित, विधवा-विधुर तसेच अपंग वधू-वरांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व वधू-वरांना आपला परिचय देण्याची सुवर्णसंधी मिळाली.
मान्यवरांनी समाजातील या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करताना, गुरु रविदास महाराजांचा भव्य पुतळा आणि सभागृह बांधणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी श्री. विश्वनाथ सावकारे, श्री. संजय वानखेडे, अॅड. डॉ. अर्जुन भारुडे, प्रकाश रोजतकर, कमलाकर ठोसर, श्री. राजेश वाडेकर, मनोज भाऊ सोनवणे, सौ. ज्योतीताई निंभोरे, श्री. गणेश काकडे, श्री. डी. बी. मोरे, श्री. गजानन दांडगे, श्री. संदीप ठोसर, सौ. योगिता वानखेडे, सौ. सुनीता वानखेडे, लता सावकारे, प्रा. संदीप शेकोकार, श्री. पंकज तायडे, श्री. शिवदास कळसकर, सौ. उषाताई दांडगे, श्रीमती संगीता चिमणकर, श्री. यशवंत वानखेडे, श्री. भागवत सावकारे, श्री. प्रवीण बाविस्कर, श्री. लोकेश भारुडे, श्री. सुजल सावकारे, श्री. रोहित सावकारे, श्री. पुरुषोत्तम चिमणकर आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमातील स्नेहभोजन व फराळाची जबाबदारी नगरसेविका सौ. सुरेखाताई तायडे यांनी सांभाळली, तर टेन्ट हाऊस व्यवस्थापनाची जबाबदारी श्री. राजेश वाडेकर यांनी पार पाडली. सभागृहाची व्यवस्था श्री. विष्णूभाऊ भंगाळे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय वानखेडे सर, प्रा. धनराज भारुडे आणि डॉ. संजय भटकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर अॅड. डॉ. अर्जुन भारुडे यांनी आभारप्रदर्शन केले.

एकात्मतेचा, संस्कारांचा आणि समाजहिताचा संदेश देणारा हा मेळावा भावनिक वातावरणात पार पडला. समाजातील सर्व थरातील बांधवांचा सहभाग पाहता, हा मेळावा चर्मकार समाजाच्या ऐक्य, प्रगती आणि नव्या दिशेचा सुंदर आरंभ ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *