“लोकसेवेचा ध्यास घेऊन पुढे — सौ. सुषमाताई देसले जिल्हा परिषदेच्या रणांगणात!”
1 min read

“लोकसेवेचा ध्यास घेऊन पुढे — सौ. सुषमाताई देसले जिल्हा परिषदेच्या रणांगणात!”

Loading

“लोकसेवेचा ध्यास घेऊन पुढे — सौ. सुषमाताई देसले जिल्हा परिषदेच्या रणांगणात!”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) —
दहिवद गावातील लोकनियुक्त सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आणि समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सौ. सुषमाताई वासुदेव देसले या आता जिल्हा परिषद सदस्यपदासाठी दहिवद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.
गावातील विकासकामांपासून ते महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या अडचणींपासून उपेक्षित घटकांच्या समस्यांपर्यंत, प्रत्येक पातळीवर ताईंनी लढा दिला आहे. त्यांच्या कार्यामुळे दहिवद ग्रामपंचायतने अनेक आदर्श प्रकल्प राबवले आहेत. वृक्षारोपण मोहिमा, महिलांसाठी रोजगार निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम अशा विविध समाजोपयोगी कामांनी ताईंचे योगदान सर्वदूर पोहोचले आहे.
ताईंच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली असून, त्यांना विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
याशिवाय, अखिल भारतीय सरपंच परिषद या व्यासपीठावरही ताई सक्रीय आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याविषयी त्या ठिकाणी त्यांनी प्रभावी मांडणी करून लक्ष वेधले आहे.
सुषमाताईंच्या या सामाजिक प्रवासात त्यांना त्यांच्या परिवाराचे मोलाचे पाठबळ लाभले आहे.
त्यांचे मार्गदर्शक पती मा. आण्णासाहेब वासुदेव देसले (डीवायएसपी) हे न्यायनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात. सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे देसले दांपत्यावर संपूर्ण अमळनेर तालुक्याचा प्रेमळ विश्वास आहे.
ताईंच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, कार्यतत्परता आणि लोकांप्रती आत्मीयता यांचे सुंदर मिश्रण दिसते. म्हणूनच जनतेतून असा आवाज उमटतो —

> “ताईंचा विजय म्हणजे विकासाचा विजय!”

सुषमाताई देसले म्हणतात :

> “आजवरच्या माझ्या सामाजिक जीवनात, मी सदैव लोकसेवा, सामान्य जनतेच्या अडचणी आणि विकासाच्या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा, समस्या ऐकून त्यावर मार्ग काढण्याचा मला नेहमीच ध्यास राहिला आहे.
याच लोकसेवेच्या कार्याला अधिक व्यापक रूप देण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी इच्छुक आहे.
तुमच्या विश्वास, प्रेम आणि पाठबळावरच मी उभी आहे, आणि आता हा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे.
ही केवळ निवडणूक नाही, तर तुमच्या हक्काच्या विकासाची सुरुवात आहे.”

🖋️ आपला स्नेहांकित :
ईश्वर महाजन, पत्रकार – अमळनेर
📞 9860352960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *