तलाव सुशोभिकरणामुळे सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला; नागरिक त्रस्त, ताडेपुरा तलावाजवळ सांडपाणी साचल्याने नागरिकांना त्रास — पाणी निवारणासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या तातडीच्या कारवाईची मागणी
1 min read

तलाव सुशोभिकरणामुळे सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला; नागरिक त्रस्त, ताडेपुरा तलावाजवळ सांडपाणी साचल्याने नागरिकांना त्रास — पाणी निवारणासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या तातडीच्या कारवाईची मागणी

Loading

तलाव सुशोभिकरणामुळे सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला; नागरिक त्रस्त

ताडेपुरा तलावाजवळ सांडपाणी साचल्याने नागरिकांना त्रास — पाणी निवारणासाठी अमळनेर नगरपरिषदेच्या तातडीच्या कारवाईची मागणी

अमळनेर प्रतिनिधी :
ताडेपुरा भागातील तलावाजवळील परिसरात सांडपाणी साचल्याने नागरिकांचे जीवन संकटात आले आहे. राहूल भास्कर कंजर (रा. ताडेपुरा, अमळनेर) यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी यांना पाठवलेल्या तक्रारीत सांगितले की, तलावाचे सुशोभिकरणाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने संपूर्ण ताडेपुरातील सांडपाणी आणि गटारीचे पाणी योग्यरित्या वाहून नेण्याऐवजी त्याचा बॉल्क करून नैसर्गिक प्रवाह रोखला आहे.
यामुळे तलावाजवळील परिसरात सांडपाणी साचले असून, तलावाजवळील वस्तीमध्ये डेंग्यूची मंच्छरे, गोगलगायी, साप आणि इतर किटकांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना वेगवेगळे आजार लागण्याची भीती असून, दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले आहे.
तक्रारदार राहुल कंजर यांनी तात्काळ नगरपरिषदेने सांडपाण्याचा निवारण करून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
सदर तक्रारीमुळे स्थानिक प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, तलावाजवळील परिसराचे स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *