नतमस्तक राष्ट्रनेत्यांना — शारदा माध्यमिक विद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिवादन
1 min read

नतमस्तक राष्ट्रनेत्यांना — शारदा माध्यमिक विद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिवादन

Loading

नतमस्तक राष्ट्रनेत्यांना — शारदा माध्यमिक विद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी :
शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथे आज शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भारताच्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन मोठ्या श्रद्धाभावाने अभिवादन केले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रनेत्यांच्या स्मरणार्थ माल्यार्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की,

“नसेल कोणाला राष्ट्रनेत्यांचे स्मरण! नसेल कोणाला त्यांच्यासाठी वेळ! दिवाळी असो वा ऊन्हाळी सुटी, रविवार असो वा शासकीय सुटी, कोणाच्या आदेशाची नाही आम्हा आशा! आम्ही दिन-रात्र सज्ज आहोत शाळेची प्रतिभा व प्रतिमा उंचावण्यासाठी, राष्ट्रीय, शासकीय व शालेय कामासाठी.”
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे म्हटले की, “भारताचे लोहपुरुष व भारताची आयर्न लेडी यांना आज नतमस्तक होऊन आम्ही अभिवादन करतो! अभिवादन!! अभिवादन!!!”
या उपक्रमातून शाळेतील कर्मचाऱ्यांची देशभक्ती, शाळेच्या विकासासाठी समर्पण आणि राष्ट्रीय नेत्यांबद्दलच्या कृतज्ञतेचा सुंदर संदेश समाजासमोर आला.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या कार्यसम्राट सेवक वर्गाने केले असून त्यांनी ह्या प्रेरणादायी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *