ग्राहक पंचायतच्या तक्रारीवर तहसीलदारांचा तत्पर निर्णय , शंभर रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती बंद – नागरिकांना मोठा दिलासा!,  ग्राहक हिताचे जतन – तहसीलदार सुराणा साहेबांचा लोकाभिमुख निर्णय
1 min read

ग्राहक पंचायतच्या तक्रारीवर तहसीलदारांचा तत्पर निर्णय , शंभर रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती बंद – नागरिकांना मोठा दिलासा!, ग्राहक हिताचे जतन – तहसीलदार सुराणा साहेबांचा लोकाभिमुख निर्णय

Loading

ग्राहक पंचायतच्या तक्रारीवर तहसीलदारांचा तत्पर निर्णय

शंभर रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती बंद – नागरिकांना मोठा दिलासा!

ग्राहक हिताचे जतन – तहसीलदार सुराणा साहेबांचा लोकाभिमुख निर्णय

अमळनेर प्रतिनिधी
दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी माननीय तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्याकडे शासकीय भेट अंतर्गत तक्रार करताना सांगितले की शासनाने शासकीय ,निमशासकीय तसेच शैक्षणिक इतर कामासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र हे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर करून देणे बाबत बंधनकारक नसताना सरसकट ग्राहकांना शासकीय निम शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर करून करून देणे बाबत सक्ती करीत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे त्यासंदर्भात तहसीलदार मा. सुराणा साहेबांशी भेट घेऊन केली .या बाबतीत व्यथा मांडली असता त्यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित कार्यालयांशी फोनवर सपंर्क करून स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र न घेता स्वयंघोषणापत्र कोऱ्या कागदावर घ्यावे व अत्यंत महत्त्वाच्या कोर्ट कामासाठीच स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र घ्यावे असे सूचित केले त्यामुळे आर्थिक कमकुवत ग्राहकांना तथा नागरिकांना तसेच अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे .यासाठी अ.भा. ग्राहक पंचायत अमळनेर यांनी तहसीलदार साहेबांचे तत्काळ दखल घेतल्याबद्दल आभार मानले . याप्रसंगी अ.भा.ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीच्या सदस्य सौ एडवोकेट भारती अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश देशमुख सर , जिल्हा उपसचिव मकसूद बोहरी तसेच तालुका पदाधिकारी सुनील वाघ, विजय शुक्ला, सौं ज्योती भावसार , महेश पाटील ,भाऊसाहेब देशमुख ,जेष्ठ पत्रकार श्री आबासो सुभाष पाटील घोडगावकर , दिलीप सारजे आदी सभासद उपस्थित होते अशी माहिती सौ मेहराज बोहरी कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *