एकतेचा जयघोष! अमळनेर पोलीसांच्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा
1 min read

एकतेचा जयघोष! अमळनेर पोलीसांच्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा

Loading

एकतेचा जयघोष!
अमळनेर पोलीसांच्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा

अमळनेर प्रतिनिधी –
भारताचे पहिले गृहमंत्री, “लौहपुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे “वॉक फॉर युनिटी” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता महाराणा प्रताप चौक, अमळनेर येथे पार पडणार असून, शहरातील सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निमित्ताने अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले की, “सरदार पटेल यांनी अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजात पोहोचावी, या हेतूने ‘वॉक फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरातील सामाजिक एकात्मता, बंधुता आणि सलोखा वृद्धिंगत होईल.”
या कार्यक्रमात अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व मान्यवर नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार आणि युवकवर्ग यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकतेचा जयघोष, देशभक्तीचा आवेश आणि समाजबंधाची जाणीव यांचा संगम असलेला हा उपक्रम — “वॉक फॉर युनिटी” — नक्कीच अमळनेरकरांच्या मनात देशप्रेमाची नवी चेतना निर्माण करेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *