सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीच्या बाबतीत समन्वय समितीचे सहाय्यक संचालकांना निवेदन सादर
1 min read

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीच्या बाबतीत समन्वय समितीचे सहाय्यक संचालकांना निवेदन सादर

Loading

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्तीच्या बाबतीत समन्वय समितीचे सहाय्यक संचालकांना निवेदन सादर

जळगाव : मॅट्रिकपूर्व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर आज तागायत जमा झालेले नसल्याने तसेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता शासनामार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती तसेच इतर विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेत अनेक शाळा, विद्यार्थी व पालक यांना आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि अर्ज सादरीकरणाबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता भासत असल्याने, जिल्हा पातळीवर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात सहाय्यक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) कार्यालय, जळगाव येथे सहाय्यक संचालक श्री. योगेश पी. पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिष्यवृत्ती प्रभारी शिक्षक तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली

निवेदन देताना समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल, समन्वयक व जळगाव पूर्व विभाग माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री. तुळशीराम सोनवणे, श्री. प्रेमकुमार झवंर, श्री. अनिल चव्हाण, श्री. संभाजी आस्वार व श्री. शरद वाघ नितीन बारी दिलीप प्रधान हेही यावेळी उपस्थित होते.

या कार्यशाळेद्वारे सर्व पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ वेळेत व विनाअडथळा मिळावा, हा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *