वारकऱ्यांच्या सेवेत नवा अध्याय! ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांची अमळनेर तालुका सहसचिवपदी नियुक्ती
![]()
वारकऱ्यांच्या सेवेत नवा अध्याय! ह.भ.प. मुरलीधर चौधरी यांची अमळनेर तालुका सहसचिवपदी नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी – श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्ट आणि सेवा समितीने समाजभूषण, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व ह.भ.प. मुरलीधर तुळशीराम चौधरी रा. कळमसरे यांची अमळनेर तालुका सहसचिव पदावर नियुक्ती केली आहे.
ह.भ.प. चौधरी हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक असून त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग दिला आहे. त्यांच्या अनुभव व समर्पणाचा विचार करून विश्वस्त मंडळाने ही नियुक्ती केली आहे, जी वर्षांसाठी अथवा मंडळ ठरवेल तोपर्यंत वैध राहणार आहे.
नवीन पदभार स्वीकारताना ह.भ.प. चौधरी यांनी संप्रदायाच्या हितासाठी समितीच्या सर्व उपक्रमात सक्रीय सहभाग देण्याची प्रतिज्ञा केली. ही नियुक्ती श्री गुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर व ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर यांनी केली.
या निर्णयामुळे अमळनेर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या उपक्रमांना निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.
ह.भ.प मुरलीधर चौधरी यांनी महाराष्ट्र माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विविध पद त्यांनी भूषविली आहेत. कळमसरे येथे समाजाच्या सर्व कामांमध्ये चौधरी यांचा मोठा सहभाग असतो ..त्यांच्या या निवडीबद्दल कळमसरे येथील सर्व समाजातील स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

