शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५’ जाहीर , शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
1 min read

शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५’ जाहीर , शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

Loading

शैला बैसाणे यांना ‘राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५’ जाहीर ,
शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

अमळनेर (प्रतिनिधी) : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ईगल फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा “राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली-रंजाणे (ता. अमळनेर) येथील उपशिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांची निवड करण्यात आली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, विद्यार्थ्यांप्रती निष्ठा आणि अध्यापनातील नवीन उपक्रम या कामगिरीच्या आधारावर त्यांना हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज, आष्टा (ता. वाळवा, जि. सांगली)* येथे पार पडणार असून, देशभरातील मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मा. विलासराव कोळेकर यांनी दिली.

या पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे स्वरूप असून, विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाही या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

शैला मॅडम यांच्या या यशाबद्दल स्थानिक शिक्षकवर्ग, विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी योगदान दिल्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *