सामाजिक बांधिलकीचा आदर्श!  किरणभाऊ बहारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली गोड दिवाळी!
1 min read

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! किरणभाऊ बहारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली गोड दिवाळी!

Loading

सामाजिक बांधिलकीचा आदर्श!

किरणभाऊ बहारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली गोड दिवाळी!

अमळनेर (प्रतिनिधी ईश्वर महाजन)
सामाजिक बांधिलकी जोपासणारे, युवा नेतृत्वाचे प्रतीक असलेले आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे श्रीकृष्णा रामसिंग बहारे (किरणभाऊ) यांनी या दिवाळी पर्वात एक आगळीवेगळी मानवतादायी परंपरा जपली आहे.
ताडेपुरा प्रभाग क्रमांक ३ मधील नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना स्वतः मिठाई देऊन त्यांनी दिवाळी सणाचा आनंद अधिक गोड केला. या उपक्रमावेळी बोलताना किरणभाऊ म्हणाले, “मी स्वतः सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे या वर्गाच्या प्रत्येक भावनांची मला जाणीव आहे. समाजाची स्वच्छता राखणारे हेच खरे शहराचे रक्षक आहेत.”
दिवसेंदिवस शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मिठाई वाटपाच्या या प्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित होते आणि सर्वांनी किरणभाऊंच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.
प्रभागातील जनतेशी सातत्याने संवाद साधणारे, सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर राहणारे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर असलेले किरणभाऊ बहारे यांच्या या कृतीमुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *