अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे श्रमदानातून प्रति मानसी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार*
![]()
*अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथे श्रमदानातून प्रति मानसी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार*
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मीनल करणवाल ताई यांच्या संकल्पनेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे गटविकास अधिकारी एन आर पाटील विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, विस्तार अधिकारी इधे यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुक्यातील पिळोदे ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविलेला आहे.
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियाना चे घटक अभियानाच्या कालावधी अभियानाची नियोजन व गावकरी यांच्या सहभाग व ग्रामपंचायत ने केलेले नियोजन याबाबतची माहिती ग्रामपंचायत अधिकारी पवनकुमार वाघ यांनी ग्रामस्थ बंधू-भगिनींना भगिनींना सांगितली.
पिळोदे या ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रत्येक सोमवारी गावातून ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात येते. याबाबतची माहिती ग्रामपंचायत अधिकारी पवन कुमार वाघ यांनी दिली. या विकासात्मक उपक्रमात अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेचे *अध्यक्ष भारती पाटील, संचालक रेणुप्रसाद, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर.तसेच स्थानिक बचत गट, ग्रामपंचायतीचे सरपंच भारतीताई पाटील उपसरपंच पद्माबाई पारधी पोलीस पाटील लक्ष्मी शिंदे सहाय्यक कृषी अधिकारी विद्या पाटील बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी योगदान दिले. अशाच प्रकारचे लोकसभागातून जास्तीत जास्त मानसी झाडे लावण्याचा मानस पिळोदेतील ग्रामस्थ बंधू-भगिनींनी केलेला आहे. गावच्या विकासासाठी आधार संस्थेचे योगदान खूपच मोलाचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावचा विकास होणार गाव समृद्ध होणार असा मानस गावकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे.

