मूडी पंचायत समिती निवडणूक: सेवा व विकासाचा विश्वास सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे लोकांचा पाठिंबा आणि उमेदवारी: मूडी गावाच्या उज्ज्वल भविष्याची आशा
![]()
मूडी पंचायत समिती निवडणूक: सेवा व विकासाचा विश्वास सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे
लोकांचा पाठिंबा आणि उमेदवारी: मूडी गावाच्या उज्ज्वल भविष्याची आशा
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
मूडी परिसरातील ग्रामस्थांच्या विकास आणि सेवाभावाच्या अपेक्षांना उत्तर देताना, सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. शिक्षण आणि सामाजिक सेवेत पार्श्वभूमी असलेली ज्योत्सना, आपले पती हर्षल सोनवणे यांच्या प्रेरणेतून आणि अनुभवातून ग्रामस्थांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास सज्ज आहेत.
हर्षल सोनवणे हे कै. शिक्षण महर्षी विनायक पाटील यांचे नातू आणि स्वर्गीय डॉ. सतीश विनायक सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. डॉ. सतीश सोनवणे यांनी कळमसरे, वासरे, खेडी, खर्डे, शहापूर, चोबारी, पाडसे परिसरातील ग्रामस्थांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा केली. ते आपल्या आयुष्यात कधीही पैशाला महत्त्व दिले नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत ग्रामस्थांची काळजी घेत राहिले. हर्षल सोनवणे यांनी या सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेत गावासाठी आणि तालुक्यासाठी सतत योगदान दिले आहे.
हर्षल सर हे ग्रामपंचायत मूडी येथे उपसरपंच म्हणून कार्यरत असून, मागील दहा वर्षांपासून शिक्षण व ग्रामविकास संस्थांमध्ये संचालक म्हणून काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा विश्वास आता त्यांच्या पत्नी सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी असा सध्या लोकांमध्ये एक चर्चा व त्यांना सपोर्ट मतदार बांधव देतांना दिसत आहे..
ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये न्याय्य प्रतिनिधित्व करण्याचा जनतेचा ठाम आवाज आता उमेदवारीच्या रूपात दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या मते, सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे या मूडी गणाच्या विकासासाठी योग्य उमेदवार ठरतील अशी सध्या चर्चा सुरू आहे..
सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे यांच्या निवडणुकीसाठी लोकांनी पाठिंबा दर्शवीला आहे . ज्यामुळे ग्रामीण भागातील सेवा, शिक्षण व विकासाचा प्रवास अधिक वेगवान होईल.
ः

