मूडी पंचायत समिती निवडणूक: सेवा व विकासाचा विश्वास – सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे  लोकांचा पाठिंबा आणि उमेदवारी: मूडी गावाच्या उज्ज्वल भविष्याची आशा
1 min read

मूडी पंचायत समिती निवडणूक: सेवा व विकासाचा विश्वास – सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे लोकांचा पाठिंबा आणि उमेदवारी: मूडी गावाच्या उज्ज्वल भविष्याची आशा

Loading

मूडी पंचायत समिती निवडणूक: सेवा व विकासाचा विश्वास – सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे

लोकांचा पाठिंबा आणि उमेदवारी: मूडी गावाच्या उज्ज्वल भविष्याची आशा

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
मूडी परिसरातील ग्रामस्थांच्या विकास आणि सेवाभावाच्या अपेक्षांना उत्तर देताना, सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे पंचायत समिती निवडणूक लढवत आहेत. शिक्षण आणि सामाजिक सेवेत पार्श्वभूमी असलेली ज्योत्सना, आपले पती हर्षल सोनवणे यांच्या प्रेरणेतून आणि अनुभवातून ग्रामस्थांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास सज्ज आहेत.
कैलासवासी विनायकराव पाटील यांनी अमळनेर तालुक्यात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली, अनेक संस्था स्थापन केल्या आणि हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तसेच त्यांनी अनेकांना नोकऱ्या दिल्या आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आदर्श उभे केले. त्यांच्या मितभाषी आणि लोकहितकारी व्यक्तिमत्वामुळे कैलासवासी विनायकराव पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे.
हर्षल सोनवणे हे कै. शिक्षण महर्षी विनायकराव पाटील यांचे नातू आणि स्वर्गीय डॉ. सतीश विनायकराव सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. डॉ. सतीश सोनवणे यांनी कळमसरे, वासरे, खेडी, खर्डे, शहापूर, , पाडसे परिसरातील ग्रामस्थांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा केली. ते आपल्या आयुष्यात कधीही पैशाला महत्त्व दिले नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत ग्रामस्थांची काळजी घेत राहिले. हर्षल सोनवणे यांनी या सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली असून गावासाठी आणि तालुक्यासाठी सतत योगदान दिले आहे.
हर्षल सर हे ग्रामपंचायत मूडी येथे माजी उपसरपंच , मागील दहा वर्षांपासून शिक्षण व ग्रामविकास संस्थांमध्ये संचालक म्हणून काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा विश्वास आता त्यांच्या पत्नी सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे यांच्या नेतृत्वावर आहे. लोकांना विश्वास आहे की त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी आणि मूडी परिसरातील सेवा, शिक्षण व विकासाच्या कामांना नवे दिशा मिळेल.
ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये न्याय्य प्रतिनिधित्व करण्याचा जनतेचा ठाम आवाज आता उमेदवारीच्या रूपात दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या मते, सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे या मूडी गटाच्या विकासासाठी योग्य उमेदवार ठरतील अशी चर्चा सुरू आहे.
सौ. ज्योत्सना हर्षल सोनवणे यांच्या निवडणुकीसाठी लोकांनी दिलेला पाठिंबा ग्रामीण भागातील सेवा, शिक्षण व विकासाचा प्रवास अधिक वेगवान करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

जाहिरात—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *