माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालयात प्रेरणादायी कार्यक्रम
1 min read

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालयात प्रेरणादायी कार्यक्रम

Loading

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालयात प्रेरणादायी कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी
जवखेडा (ता. अमळनेर) येथील श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन मराठा संस्थेचे बी. बी. ठाकरे हायस्कूल अंतर्गत श्रीराम नथु रवंदळे भाग शाळा, जवखेडे येथील उपशिक्षक श्री. निरंजन पेंढारे सर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षिका व खान्देश साहित्य संघाच्या अध्यक्षा सौ. सुनीता पाटील मॅडम तसेच सौ. रत्नप्रभा साळुंखे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी भव्य पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. विविध पुस्तकांचे वाचन करून विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपादनाचा आनंद घेतला. शासनाने घोषित केल्यानुसार डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्याच अनुषंगाने हा उपक्रम पार पडला.
कवयित्री सुनिता पाटील मॅडम यांनी आपल्या कवितांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. तर अध्यक्षीय भाषणात पेंढारे सर यांनी “जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारा मूलमंत्र” उदाहरणांसह सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शेवटी आपल्या मनोगतात पेंढारे सर म्हणाले की, “दरवर्षी वाचनालयात विविध उपक्रम राबवले जातात. येथे उपलब्ध असलेल्या विपुल वाचनसाहित्य, वर्तमानपत्रे व नियतकालिकांचा लाभ सर्व गावकरी घेतात. या माध्यमातून निश्चितच सक्षम व यशस्वी पिढी घडेल.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *