सीईओ मिनल करनवाल यांच्या प्रयत्नाने जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा — 682 पदे ‘सेवार्थ’ प्रणालीत समाविष्ट, पगाराचा प्रश्न कायमचा निकाली!”
1 min read

सीईओ मिनल करनवाल यांच्या प्रयत्नाने जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा — 682 पदे ‘सेवार्थ’ प्रणालीत समाविष्ट, पगाराचा प्रश्न कायमचा निकाली!”

Loading

“सीईओ मिनल करनवाल यांच्या प्रयत्नाने जळगाव जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा — 682 पदे ‘सेवार्थ’ प्रणालीत समाविष्ट, पगाराचा प्रश्न कायमचा निकाली!”

जळगाव प्रतिनिधी |
15 ऑक्टोबर 2025
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनलजी करनवाल मॅडम यांच्या कुशल नेतृत्वाखाली व अथक पाठपुराव्यामुळे तब्बल पाच महिन्यांपासून थकलेले आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगाराचे प्रश्न अखेर सुटले आहेत.

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची 682 पदे ‘सेवार्थ प्रणाली’मध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासन, मुंबई येथे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून सर्व पदे प्रणालीत जोडण्यात आली आहेत. परिणामी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रॉब्लेम कायमचा दूर झाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयानंतर, आरोग्य सहाय्यक व एन.एम.-एल.एच.वी. सवर्गातील कर्मचाऱ्यांना आरोग्य विस्तार अधिकारी पदावर, तसेच ए.एन.एम. सवर्गातील कर्मचाऱ्यांना एल.एच.वी. पदावर, आणि एम.पी.डब्ल्यू. सवर्गातील कर्मचाऱ्यांना एच.ए. पदावर पदोन्नती मिळाली आहे. या सर्व घटनांमुळे जिल्हा आरोग्य विभागात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनलजी करनवाल मॅडम यांना “वह्या” भेट देऊन, तसेच या सर्व प्रक्रियेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे मा. डॉ. सचिनजी भायेकर – जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पुष्पगुच्छ आणि थोर महात्म्यांचे पुस्तक भेट देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
यासोबतच जि.प. आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक या सर्वांनी संघटनेमार्फत पुष्पगुच्छ देऊन एकमेकांचे हार्दिक अभिनंदन केले.
या आभार प्रदर्शनाच्या प्रसंगी श्री. संजय ठाकूर, श्री. विजय देशमुख, श्री. राजेश कुमावत, श्री. सुनील शिंदे, श्री. भालचंद्र पवार आणि श्री. नामदार तडवी या सर्व संघटना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

जळगाव जिल्ह्यातील सर्व संघटना तथा आरोग्य कर्मचारी वर्गाकडून मा. मिनलजी करनवाल मॅडम, डॉ. सचिन भायेकर सर व संपूर्ण आरोग्य विभागाला मनःपूर्वक आभार व अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *