नोबेल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर संस्था गटात युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया आणि मिलके चलो असोसिएशन तर शिक्षक गटात उमेश इंगळे,दीपक चौधरी डॉ. सी.व्ही. रमण पुरस्काराचे मानकरी, हिंगणघाटचा यथार्थ जनाईकर डॉ. एपीजे कलाम बाल शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड.
1 min read

नोबेल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर संस्था गटात युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया आणि मिलके चलो असोसिएशन तर शिक्षक गटात उमेश इंगळे,दीपक चौधरी डॉ. सी.व्ही. रमण पुरस्काराचे मानकरी, हिंगणघाटचा यथार्थ जनाईकर डॉ. एपीजे कलाम बाल शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड.

Loading

नोबेल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर
संस्था गटात युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया आणि मिलके चलो असोसिएशन तर शिक्षक गटात उमेश इंगळे,दीपक चौधरी डॉ. सी.व्ही. रमण पुरस्काराचे मानकरी, हिंगणघाटचा यथार्थ जनाईकर डॉ. एपीजे कलाम बाल शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड.

जळगाव – भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तसेच नोबेल फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था जळगाव, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी कार्य करीत असणाऱ्या संस्था शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्काराने गौरविण्यात येते. 2100 रुपये सन्मानपत्र व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप दरवर्षी असते. यासाठी निरज अग्रवाल ,डॉ. प्रमोद माहुलीकर, डॉ संजय शेखावत, तसेच जामनेर येथील पोद्दार जीनियस इंटरनॅशनल स्कूल चे सहकार्य लाभते.
या अंतर्गत 2025 या वर्षासाठी नोबेल विज्ञान पुरस्कार संस्था गटासाठी जळगाव येथील योगी म्हणजेच युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया या संस्थेच्या पर्यावरणविषयक कार्यासाठी तसेच अमळनेर तालुक्यातील मिलके चलो असोसिएशन या संस्थेची निवड करण्यात आलेली आहे .अनिरुद्ध पाटील आणि सहकारी या असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रयोगशाळा पोहोचवून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण करीत आहेत.तसेच डॉ. सी व्ही रमण विज्ञान शिक्षक पुरस्कारासाठी विवेकानंद प्रतिष्ठान जळगावचे विज्ञान शिक्षक, पक्षीप्रेमी उमेश इंगळे तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव हायस्कूलचे शिक्षक दीपक चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी दशेमध्ये विज्ञान विषयातील नाविन्यपूर्ण उपक्रम प्रकल्प तसेच विज्ञानातील यशाबद्दल हिंगणघाट येथील अथर्व जनईकर याची राज्यस्तरीय डॉ.एपीजे अब्दुल कलाम बाल वैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. तसेच माजी राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा नोबेल विज्ञान प्रतिभा पुरस्कारासाठी नंदुरबार येथील समुत्कर्श क्लासेसचे संचालक ललित महाजन यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
सदर पुरस्कारांची निवड पुरस्कार समिती अध्यक्ष माजी प्र कुलगुरू डॉ. प्रमोद माहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लवकरच भव्य समारंभात सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *