राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा*
1 min read

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा*

Loading

*राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा*

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय व पारोळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आज रोजी घेण्यात आली कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते पीएसआय विजय भोंबे साहेब होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील यांनी भूषविले. माननीय विजय भोंबे सर यांनी सायबर सुरक्षा संदर्भात इंस्टाग्राम, फेसबुक, हनी ट्रॅप इत्यादी संदर्भात होत असलेल्या फसवणुकी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन करत असताना काही व्हिडिओ सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. जेणेकरून विद्यार्थ्यांची अशी कोणतेही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन करत असताना मुलं मुली मधील होत असलेले मोबाईल वरील संदेश त्या संदेशाची हॅकर्स द्वारे ब्लॅकमेलिंग करणे तसेच पैशांची मागणी करणे असे प्रकार घडत असतात. अशा स्वरूपाची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. डॉ. वंदना पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. काही फसवणुकीच्या दाखल्यांद्वारे त्यांनी प्रसंग वर्णन करीत विद्यार्थ्यांना आव्हान केले मोबाईलचा वापर सुरक्षित पद्धतीने करावा जेणेकरून आपली कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी. कार्यक्रमासाठी पारोळा पोलीस स्टेशनचे हवलदार जुबेर खाटीक हजर होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. पी. एस. कोळी यांनी केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पी. पी. पाटील, ए. ए. मोरे, डॉ. ईश्वर पाटील,श्रीमती एस बी साळुंखे, सौ. एम आर नेरकर तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *