विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन
![]()
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे आज मा. कुलगुरू यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत —
1. रिचेकिंग निकालातील विलंब:
विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केल्यानंतर बराच काळ निकाल लागण्यात विलंब होत असून, त्याच कालावधीत पुढील परीक्षा सुरू होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक ताण वाढत आहेत व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे.
2. प्राध्यापकांच्या वेळापत्रकातील विसंगती:
प्राध्यापकांना ठराविक वेळेत पोर्टलवर गुण (Marks) अपलोड करणे बंधनकारक आहे, परंतु याच वेळेत नियमित अध्यापनकार्य सुरू असल्याने त्यांना शिकवणी थांबवून तांत्रिक काम करावे लागते. यामुळे अभ्यासक्रम (Syllabus) अपूर्ण राहतो आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होते.
3. वसतिगृह व मेस सुविधांचा दर्जा:
विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून मेसमधील अन्नाचा दर्जा अत्यंत नित्कृष्ट असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.
NSUI तर्फे विद्यापीठ प्रशासनास मागणी करण्यात आली की रिचेकिंग निकालासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करावी यासह प्राध्यापकांच्या गुण नोंदणीसाठी स्वतंत्र वेळ स्लॉट ठेवावा तसेच वसतिगृह स्वच्छतेसाठी स्वतंत्र समिती नेमून मेसच्या अन्नगुणवत्तेवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली सदर निवेदन NSUI राष्ट्रीय सचिव श्री. अक्षय यादव, महाराष्ट्र NSUI प्रदेश अध्यक्ष श्री. सागर साळुंके, तसेच जिल्हा प्रभारी ऍड. कौस्तुभ पाटील, जिल्हा काँग्रेस नेते धनंजय चौधरी, NSUI जळगावचे घनश्याम महाजन व विवेक सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलगुरूंना देण्यात आले.या प्रसंगी NSUI पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संघटनेने विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

