पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचानालय अमळनेर येथे उदया वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन*
![]()
*पूज्य साने गुरुजींचे ग्रंथालय अमळनेर तर्फे उदया वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन*
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर तर्फे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 9 वाजता वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे . वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे हा या वाचन प्रेरणा दिनाचा मुख्य हेतू आहे.तरी वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. याप्रसंगी वर्षभर नियमित वाचन करणारा इयत्ता सातवी वर्गाचा विद्यार्थी कु. मयूर गजानन पाटील याचा बालवाचक म्हणून पूज्य साने गुरुजी ग्रंथालयातर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तरी वाचक बंधू-भगिनींनी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान पूज्य साने गुरुजी ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.
असे दिलीप सोनवणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, डॉ माधूरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ व सर्व संचालक मंडळ व स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार सर सह कर्मचारी, वाचक उपस्थित राहणार आहेत.

