शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र काळाची गरज* – पद्मश्री चैत्राम दादा पवार यांचे प्रतिपादन. ———————————————– ● ‘प्रताप’ मध्ये खान्देश अर्थशास्त्र परिषदेचे दुसरे आधिवेशन संपन्न ● 97 संशोधकांनी लिहिले लेख ● मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.सुरेश मईंद उदघाटक ● खानदेश अर्थशास्त्र परिषद व प्रताप कॉलेजचा संयुक्त उपक्रम. ● श्री.योगेशजी मुंदडे समारंभाचे अध्यक्षस्थानी ● आत्मनिर्भर भारताची गरज-सीए नीरजजी अग्रवाल यांचे मत ● 127 प्रतिनिधींची उपस्थिती
![]()
*शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र काळाची गरज* – पद्मश्री चैत्राम दादा पवार यांचे प्रतिपादन.
———————————————–
● ‘प्रताप’ मध्ये खान्देश अर्थशास्त्र
परिषदेचे दुसरे आधिवेशन संपन्न
● 97 संशोधकांनी लिहिले लेख
● मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य
प्रा.सुरेश मईंद उदघाटक
● खानदेश अर्थशास्त्र परिषद व प्रताप
कॉलेजचा संयुक्त उपक्रम.
● श्री.योगेशजी मुंदडे समारंभाचे
अध्यक्षस्थानी
● आत्मनिर्भर भारताची गरज-सीए
नीरजजी अग्रवाल यांचे मत
● 127 प्रतिनिधींची उपस्थिती
———————————————–
अमळनेर प्रतिनिधी- खानदेश अर्थशास्त्र परिषद व अर्थशास्त्र विभाग,प्रताप कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनाचे उदघाटन समारंभ पूज्य साने गुरुजी सभागृहात 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान संपन्न झाले.
प्रस्तुत खानदेश अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशन प्रसंगी सरस्वती देवी,कर्मयोगी -दानशूर प्रताप शेठजी,पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.तदनंतर डॉ.हर्ष नेतकर व राजनंदिनी यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुस्वागतम..ज्ञानाचा मुजरा गीताच्या माध्यमातून केले.
यावेळी विचार मंचावर जेष्ठ संचालक श्री योगेश भैया मुंदडे प्रस्तुत समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विचारमंचावर खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, बारीपाडा प्रकल्पाचे शिल्पकार भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले चैत्रामदादा पवार, मुंबई विद्यापीठाचे आधिसभा सदस्य तथा अर्थशास्त्र व धोरण या विभागाचे प्राध्यापक डॉ.सुरेश महिंद, एस.एन.डी.टी महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.संजय फड,खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव,खानदेश अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा.विद्या पाटील, सचिव प्रा.आर पी पाटील, कार्याध्यक्ष ए.डी.गोसावी,भारतीय आयुर्विमा अधिकारी अजय भाऊ रोडगे इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.व्ही बी मांटे यांनी केले. यावेळी खानदेश अर्थशास्त्र परिषदेचे अनेक सन्माननीय प्राध्यापक, पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते.अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.मनोज तलवारे,माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.मोहन पावरा, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.मनोज गायकवाड,प्रा एन एल चव्हाण,डॉ.जगतराव धनगर (अहमदाबाद), डॉ.विशाल हौसे,डॉ.काटे,अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सर्व सन्मानीय सदस्य, याचप्रमाणे अनेक प्राध्यापक बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होते.
यावेळी खानदेश अर्थशास्त्र परिषदेसाठी जवळपास 97 जणांनी आपले संशोधन पर लेख पाठविले, त्या लेखांचे एकत्रीकरण करून तीन अशा खंडामध्ये ‘खान्देशातील अर्थनीती’ या पुस्तकाचे विमोचन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी जैन इरिगेशनचे प्रमुख माननीय अशोक जी जैन यांनी शुभेच्छा पर संदेश पाठविले,त्यात त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था,नवे तंत्रज्ञान,कृषी धोरण,शाश्वत विकास यासंबंधी मत व्यक्त केले, या संदेशाचे वाचन कार्यक्रमाचे समन्वयक यांनी केले. यावेळी डॉ.जितेंद्र तलवारे लिखित ‘प्रगत स्थूल अर्थशास्त्र’ या पुस्तकाचे देखील विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.सुरेश महिंद यांचा परिचय मराठी विभागाचे डॉ.रमेश माने यांनी करून दिले तर प्रमुख मार्गदर्शक व आकर्षक पद्मश्री चैत्रामदादा पवार यांचा परिचय आपल्या ओघवत्या शैलीत मराठी विभागाचे प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी करून दिले,यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी त्यांच्या परिचयाला दाद दिली.
उद्घाटन पर मनोगतात डॉ.सुरेश महिंद म्हणाले की,अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे,काळानुसार कौशल्य धारण करणारे विषय म्हणून अर्थशास्त्र विषयाकडे पाहिले जाते.खानदेशात विप्रो,जर्दा कंपनी,तापी, त्यातील पाणीसाठा,शेतीत होणारे परिवर्तन हे लक्षात घेऊन नव तरुणांनी स्थानिक संशोधनात लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यासाठी खानदेश अर्थशास्त्र परिषद एक महत्त्वाचे मंच आहे,असे प्रतिपादन डॉ.सुरेश महिंद यांनी यावेळी केले.
दुसरे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक पद्मश्री चैत्रामदादा पवार यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतात असे सांगितले की, समाजासाठी आपण कार्य करू शकतो का ? या चिंतनातून मी विधायक व शाश्वत विचाराकडे वळलो, वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आल्याने मला विचाराची दिशा प्राप्त झाली आणि त्यातून आपण ग्रामीण विकासात योगदान देऊ शकतो,यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले.
सांघिक प्रयत्नातून शेती- जल जलसंवर्धन- पर्यावरण -मानव विकास पुन:उत्पादन या बाबीकडे लक्ष केंद्रित केले.जंगल-जल-शेती असेल तर ‘माणूस’ आहे,हा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून ‘वनसंरक्षण’ हा सिद्धांत पुढे आला,जवळपास 1100 एकर शेतीचे संवर्धन यातून करण्याचा प्रयत्न केला, कॅनडा व जर्मनीच्या विद्यार्थ्यांनी बारीपाडा प्रकल्पावर संशोधन केले.वनभाजी महोत्सव 2003 पासून सुरू केल्याने ग्रामीण अर्थशास्त्र व वनस्पतीचे मूल्ये अथवा महत्त्व समाजापुढे आले,त्यास 2025 मध्ये 21 वर्षे पूर्ण झाले.
‘सोलर ड्राय मार्केट’ या माध्यमातून 44 गावात शेतकरी उत्पादन कंपनी सुरू करून उद्योग उभारण्याचे प्रयत्न केले, 110 प्रकारच्या वनभाज्या हे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, या संदर्भात सातत्याने भूमिका पार पाडली म्हणून स्थानिक संसाधनाचे योग्य वापर झाल्यास ‘शाश्वत विकास’ होऊ शकतो, हा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.या सर्व प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची मदत मिळाली. ‘बारीपाडा प्रकल्पात’ आम्ही प्रत्येक झाडाला नेट बांधण्याची काम केले, मोहाच्या फुलापासून आम्ही छोटे छोटे उद्योग उभे करून इतर प्रगत कंपन्या सोबत MOU केले.आज वनवासी कल्याण आश्रमाचे काम सात राज्यात सुरू आहे,आमच्या बारीपाडा प्रकल्पास यूएनडीपीच्या समूहाने सुद्धा भेट दिली. आम्ही पुरस्कारासाठी काम करत नसून राष्ट्र निर्माणात जन जातीचे योगदान असावे हे या मागची महत्त्वाची भूमिका व विचारधारा घेऊन निस्वार्थ काम करण्याचे प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे,अशा पद्धतीची प्रॅक्टिकल स्वरूपाची माहिती व प्रयोग सांगण्याचे मूलभूत कार्य चैत्रामदादा पवार यांनी केले.
याप्रसंगी खानदेश अर्थशास्त्र परिषदेची माहिती आणि लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, या संदर्भात महत्त्वाची माहिती डॉ.विद्या पाटील यांनी दिली. प्रस्तुत खानदेश अर्थशास्त्र परिषदेच्या उद्घाटन पर समारंभात प्रभारी प्राचार्य डॉ हर्षवर्धन जाधव यांनी आपले मनोगत थोडक्यात व अतिशय प्रभावीरित्या सादर केले.ते म्हणाले की, ‘परिवर्तन हा जगाचा नियम आहे’, म्हणून अर्थशास्त्र विभाग या दृष्टीने सातत्यपूर्ण कार्य करीत आहे.
खानदेश अर्थशास्त्र परिषद व प्रताप महाविद्यालय यांच्या संयुक्त उपक्रमातून दुस-या अधिवेशनप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष सी ए अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,तुमचे- माझे शिक्षण खरे नसून चैत्राम पवार यांचे ग्राउंड लेव्हलला असणारे शिक्षण खरे आणि महत्त्वाचे आहे, ‘इंडिया इज रिच कंट्री विथ पुअर पोप्युलेशन’ या विधानाचा अर्थ आज बदलण्याची गरज निर्माण झाली आहे म्हणून विकसित भारताचे स्वप्न (2047) हे पूर्ण करावयाचे असेल तर आपण बेसिक टारगेट कडे दुर्लक्ष करू नये, त्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना समाजात कशी रुजली पाहिजे यासाठी तुम्ही,आम्ही आणि अर्थशास्त्र परिषद त्या दिशेने कार्य करेल अशा पद्धतीचा आशावाद सी ए नीरजजी अग्रवाल यांनी व्यक्त केला.
आज ऍग्रो बेस्ट इकॉनोमीची आवश्यकता आहे,यासाठी कृषी विद्यापीठाची संलग्नता आपल्या विद्यापीठांशी आणि त्या अंतर्गत असणा-या अभ्यासक्रमाशी कशी निगडित असू शकेल ? या संदर्भाचा प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक आहे असे मत यावेळी सीए नीरज अग्रवाल यांनी व्यक्त केले. दुपारच्या टेक्निकल सत्रात ‘खान्देशातील आर्थिक विकास: संधी व आव्हाने’ विषयांवर लेखांचे सादरीकरण होणार आहेत.
प्रस्तुत उद्घाटनपर समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.हेमलता सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ.नलिनी पाटील यांनी मानले.



