आई वडीलांची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान १९ ऑक्टोबर रोजी,  श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व माधुरी भांडारकर संस्था संयुक्त विद्यमाने उपक्रम
1 min read

आई वडीलांची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान १९ ऑक्टोबर रोजी, श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व माधुरी भांडारकर संस्था संयुक्त विद्यमाने उपक्रम

Loading

`आई वडीलांची सेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान १९ ऑक्टोबर रोजी

श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व माधुरी भांडारकर संस्था संयुक्त विद्यमाने उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी) – तालुक्यातील तसेच परिसरातील 12 व्यक्तींना “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहे. येथील श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान व डॉ.सौ. माधुरी मनोहर भांडारकर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 19 ऑक्टोबर (रविवार) रोजी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी दिली आहे.
सध्याच्या स्वार्थी युगात अनेक व्यक्ती संकुचित झाले आहेत. या वलयातून बाहेर पडण्यासाठी तसेच सुसंस्कृत कुटुंब पद्धतीला चालना देण्यासाठी संस्थानतर्फे गेल्या पाच वर्षापासून “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” दिले जात आहेत. जी व्यक्ती वृद्ध आई-वडिलांची सेवा करून आपल्या कार्यकर्तृत्वाने इतरांना प्रेरणा देतात अशा व्यक्तींना सन्मानपत्र, शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारार्थी मध्ये जयेशकुमार काटे व उमेश काटे या पत्रकार बंधूसह रमेश बुधा शिरसाट, रहेमतुल्ला बैतुल्ला पिंजारी, शशिकांत दत्तात्रेय चौधरी, प्रशांत भदाणे, चेतन महाजन, प्रशांत मनोहर वाणी, जगन्नाथ पाटील, भरतसिंग परदेशी, रमेश चिंधा चौधरी, ॲड.तिलोत्तमा पाटील, रवींद्र सोमा महाजन यांचा समावेश आहे. पुरस्कार निवडीसाठी पाच मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली होती. अजय रघुनाथ केले, विजयसिंह आधारसिंग राजपूत, रवींद्र घनश्याम पाटील, हेमंत मनोहर भांडारकर व सुभाष हरचंद चौधरी या पाच जणांच्या समितीने संकलित केलेल्या नावांची छाननी करून 12 जणांना पुरस्कार जाहीर केले आहेत. *कामगार उपायुक्त विजय चौधरी, त्र्यंबकेश्वर येथील ‘डीवायएसपी’ वासुदेव देसले, अमळनेर येथील ‘डीवायएसपी’ विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई देसले* आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या विशेष पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहेत. दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील दहावी व बारावी मधील 85% वरील गुण मिळवलेले गुणवंत विद्यार्थी तसेच तालुक्यातून शासकीय सेवेत निवड झालेल्या युवा अधिकारी यांचा ही सत्कार रविवारी (ता. 19 ऑक्टोबर) रोजी श्री. वर्णेश्वर महादेव मंदिरा परिसरात* आयोजित करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *