प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चित! सौ. स्वप्ना विक्रांत पाटील – प्रभाग क्र. १७ (अ- OBC महिला राखीव)
![]()
प्रयत्न, सातत्य आणि संयम… परिणामी यश निश्चित!
सौ. स्वप्ना विक्रांत पाटील – प्रभाग क्र. १७ (अ- OBC महिला राखीव)
अमळनेर प्रतिनिधी – समाजकारणात सातत्य, जनतेशी निष्ठा आणि कामातून विश्वास या त्रिसूत्रीवर आधारलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ. स्वप्ना विक्रांत पाटील. प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांशी त्यांनी दृढ नातं जपले असून, त्यांच्या कार्यातून सेवा, समर्पण आणि समाजहिताची ओढ स्पष्ट दिसते.
त्यांचे पती विक्रांत नानासाहेब पाटील, माजी नगरसेवक, हेही गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमध्ये अग्रेसर आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते आणि मूलभूत सुविधा या सर्वच क्षेत्रात या दाम्पत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्रभागातील कुठल्याही नागरिकावर संकट आलं की, हे दाम्पत्य तत्परतेने मदतीचा हात पुढे करते. सुखदुःखात सदैव सोबत राहणारे, लोकाभिमुख वर्तन असलेले हे दाम्पत्य आज मतदारांच्या मनात विश्वासाचा दीप प्रज्वलित ठेवत आहे.
नगर परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्र. १७ मधील जनतेचा पाठिंबा मिळवून सौ. स्वप्ना विक्रांत पाटील या निश्चितच विजयश्री मिळवतील, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांत आणि नागरिकांत व्यक्त होत आहे.
✍️ विक्रांत भास्करराव पाटील
(माजी नगरसेवक)
श्रीकृष्णपुरा, वडचौक, अमळनेर
📞 ९५७९६२३९२३

