सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जाकीर शेखचा गाढ आदरभाव; डॉ. बी. एस. पाटील यांना रक्ताने साकारलेली प्रतिमा भेट
![]()
सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जाकीर शेखचा गाढ आदरभाव; डॉ. बी. एस. पाटील यांना रक्ताने साकारलेली प्रतिमा भेट
अमळनेर प्रतिनिधी:
डॉ. बी. एस. पाटील (आबा) यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात एक विलक्षण आणि भावनिक प्रसंग घडला. आबांचे कार्यकर्ते जाकीर शेख यांनी आपल्या गुरूप्रती असलेला गाढ आदरभाव व्यक्त करत स्वतःच्या रक्ताने आबांची प्रतिमा साकारली आणि ती आबांना भेट दिली.
या प्रतिमेखाली जाकीर यांनी लिहिलेले शब्द उपस्थितांवर गहिवराचा क्षण निर्माण करणारे ठरले —
“ए चांद तू आसमान पे रहकर भी तुझपे दाग है…
लेकिन आबासाहब आप ऐसे महान इंसान हो जो सियासत में रहकर भी बेदाग हैं…”
ही कृती जाकीर शेख यांच्या आदरभाव, समर्पण आणि श्रद्धेची जिवंत साक्ष ठरली. राजकारणासारख्या क्षेत्रात जिथे प्रामाणिकपणा आणि स्वच्छ प्रतिमा दुर्मिळ होत चालली आहे, तिथे डॉ. बी. एस. पाटील यांच्यासारखे निष्कलंक, जनतेसाठी झटणारे आणि मार्गदर्शक नेते आजही प्रेरणास्थान आहेत.
या प्रसंगी माजी सभापती अरुणभाई गुजराथी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित वातावरण भावनिकतेने भारावलेले होते — एकीकडे कार्यकर्त्याचा आपल्या नेत्यावरील प्रगाढ भाव तर दुसरीकडे गुरूंच्या डोळ्यात दाटलेले समाधान आणि आपुलकीचे भाव.
आजच्या काळात डॉ. बी. एस. पाटील यांच्यासारखे विचारशील, लोकाभिमुख आणि नीतिमान नेते मिळणे विरळ झाले आहे. त्यांच्या कार्याने आणि जीवनमूल्यांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली आहे.
खरंच —
“धन्य तो शिष्य, ज्याला असे गुरू लाभले… आणि धन्य ते भाग्य, ज्यांना त्यांच्या सहवासाचा लाभ झाला.”

