अमळनेर: माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळ व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
1 min read

अमळनेर: माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळ व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Loading

अमळनेर: माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळ व साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अंमळनेर प्रतिनिधी
दि. 12-10-2025 रोजी अंमळनेर येथील माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ व पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त एक रंगतदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय मा. श्री सुधाकर बंडू येवले आप्पासाहेब यांनी स्वीकारले. तसेच, साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री शिवाजी अवचित पाटील (आण्णासाहेब) व सचिव मा. श्री एस. एम. आप्पासाहेब उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व कार्यकारी मंडळ सदस्य व सभासद मंडळाच्या मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात जेष्ठ माता भगिनींनी विविध मनोरंजक आणि कौशल्यपूर्ण स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा, लिंबू–चमचा, संगीत खुर्ची, जलद चालणे इत्यादी मनोरंजक स्पर्धांचा समावेश होता. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भगिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन करत बक्षीस जिंकले. या विजयी भगिनींमध्ये सुंदर ताई पवार, दुर्गाताई शिंदे, उषाताई पाटील, पुजाताई पाटील, शकुनंतलाताई जाधव यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे आयोजन माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्ष रजनी बी. पाटील (अंमळनेर) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. उपस्थित मंडळीयांचे उत्साह, सहभाग व आनंद यामुळे हा वर्धापन दिन आनंदोत्सवासारखा रंगला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित सदस्यांनी एकत्र येऊन सौहार्दपूर्ण चर्चा केली आणि मंडळाच्या भविष्यकालीन कार्यक्रमांसाठी नवीन कल्पना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *