टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी*
![]()
📰
*टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत ए.टी झांबरे विद्यालयाच्या केतन गिरीश पाटील द्वितीय क्रमांकाने विजयी रुपये दहा हजाराच्या बक्षिसाचा मानकरी*
ए.टी .झांबरे माध्यमिक विद्यालयातील टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत इयत्ता आठवीचा केतन गिरीश पाटील हा द्वितीय क्रमांकाने राज्यस्तरावर विजयी झाला. या स्पर्धेत त्याला रुपये दहा हजाराचे बक्षीस मिळाले. त्यानिमित्ताने विद्यालयात आज टपाल विभागातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय टपाल दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.मोहम्मद खदीर (डाक अधिक्षक जळगाव),मा.श्री.टी.एफ.तडवी (सहाय्यक डाक अधिक्षक मुख्यालय),श्री.एस.एस.म्हस्के (सहाय्यक डाक अधिक्षक उपविभाग),श्री.एस.एस.पाटील (विकास अधिकारी),श्री.एस.व्ही.मुंडे(विपणन अधिकारी) श्री.डाॅ.अशोक राणे (प्राचार्य, के.सी.ई.बी.एड काॅलेज , संचालक के.सी.ई सोसायटी जळगाव )श्रीमती प्रणिता झांबरे,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी केतन गिरीश पाटील याचा दहा हजार रुपयाचा चेक प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्याचे पालक यांचा सुद्धा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत केतनने महासागराचे मनोगत यावर पत्र लिहिले होते महासागराची प्रदूषणामुळे होणारी परिस्थिती त्याला होणारा त्रास, त्यासाठी आपण घ्यावयाची काळजी हे सगळे त्याने त्या पत्रात महासागराच्या वतीने व्यक्त केलेले होते.
यापूर्वी सुद्धा केतन गिरीश पाटील याला पोस्टातर्फे आयोजित फीलाटीले स्पर्धेत सहा हजार रुपयाची दिनदयात शिष्यवृत्ती सुद्धा मिळालेली आहे.
केतनला मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी अभिनंदन केले आहे
*प्रमुख पाहुणे मनोगत*
९ ऑक्टोबर रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय टपाल दिन (World Post Day) साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट जगभरातील टपाल सेवांचे महत्त्व ओळखून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे.
१८७४ साली स्वित्झर्लंडच्या बर्न येथे जागतिक टपाल संघटनेची (Universal Postal Union – UPU) स्थापना झाली. त्या दिवशीच म्हणजे ९ ऑक्टोबरला या दिनाचा प्रारंभ झाला. १९६९ मध्ये टोकियो येथे झालेल्या टपाल संघटनेच्या अधिवेशनात हा दिवस अधिकृतरीत्या “आंतरराष्ट्रीय टपाल दिन” म्हणून घोषित करण्यात आला.
या दिवशी विविध देशांमध्ये टपाल विभागांकडून विशेष उपक्रम राबवले जातात — जसे की टपाल तिकिटांचे प्रदर्शन, टपाल सेवांवरील स्पर्धा, निबंध लेखन आणि जनजागृती मोहिमा.
भारतामध्येही या आठवड्यात “राष्ट्रीय टपाल सप्ताह” साजरा केला जातो. या निमित्ताने नागरिकांना आधुनिक टपाल सेवा, स्पीड पोस्ट, ई-पोस्ट, पार्सल सेवा इत्यादींची माहिती दिली जाते.
📬 टपाल सेवेमुळे जग एकमेकांशी जोडले गेले आहे — हीच आंतरराष्ट्रीय टपाल दिनाची खरी भावना आहे
कार्यक्रमासाठी चेतन सोनार, संदेश करलकर, अनिल शिंदे तुषार सोनवणे यांनी सहकार्य केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चंद्रकांत कोळी यांनी केले.

