खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार
1 min read

खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन* ●विविध विकास कामांचे उदघाटन ११ ऑक्टोबर रोजी होणार ● खान्देशातील मंत्री महोदयांची उपस्थिती लाभणार

Loading

*खान्देश शिक्षण मंडळाच्या विविध विकास कामांचे उदघाटन*
●विविध विकास कामांचे उदघाटन
११ ऑक्टोबर रोजी होणार
● खान्देशातील मंत्री महोदयांची
उपस्थिती लाभणार
● खा.शि.मंडळाचे विशेष योगदान
———————————————–
अमळनेर प्रतिनिधी : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ येत्या शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.प्रस्तुत कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रगतीस हातभार लावणारी अनेक नवी उपक्रमशील प्रकल्पांची उद्घाटने होणार असून, त्यामध्ये श्री. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मसीच्या विस्तारीत इमारत, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी नूतन अत्याधुनिक संगणक लॅबचे, प्रताप महाविद्यालयातील नवीन सुसज्ज सेमिनार हॉल, तसेच पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संगणक लॅबचे व्हर्च्युअल स्वरूपात उद्घाटन होणार आहे.
या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष मा. ना. भाऊसो.श्री.गुलाबरावजी पाटील (पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव जिल्हा), तसेच विविध विकास कामांचे उद्घाटक म्हणून मा.ना.श्री.भाऊसो.गिरीशजी महाजन (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ना. भाऊसो. श्री.संजयजी सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य), मा. श्रीमती स्मिताताई वाघ (खासदार जळगाव लोकसभा), मा.आमदार दादासो.श्री.अनिलजी पाटील (माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार, अमळनेर विधानसभा) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.भैयासो.अनुपजी अग्रवाल (आमदार,धुळे शहर विधानसभा), मा.दादासो.श्री.अमोलजी पाटील(आमदार,पारोळा -एरंडोल विधानसभा), मा.भैयासो.सत्यजीत तांबे (आमदार,विधानसभा परिषद, महाराष्ट्र राज्य), मा.आबासो.श्री.डॉ.बी.एस. पाटील (माजी आमदार,अमळनेर विधानसभा), मा. कृषिभूषण दादासो. श्री. साहेबरावजी पाटील (माजी आमदार,अमळनेर विधानसभा),मा. दादासो.श्री.शिरीषजी चौधरी (माजी आमदार,अमळनेर विधानसभा) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवर अतिथींची उपस्थिती लाभणार आहे.खानदेश शिक्षण मंडळाच्या सर्व संस्थांचा शैक्षणिक विकास आणि आधुनिकतेकडे वाटचाल या कार्यक्रमातून दृढ होणार आहे.
सदर कार्यक्रमास खा.शि.मंडळाचे सर्व सभासद, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, पालकवर्ग व नागरिकांनी उपस्थित राहून या शुभ कार्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन खान्देश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
प्रताप महाविद्यालय हे अमळनेर शहरातील एक महत्त्वाचे वैभव आहे. काळाची पाऊले ओळखत खा. शि. मंडळाने पारंपरिक विषय व शिक्षण यांच्या जोडीला व्यवसायाभिमुख व रोजगाराभिमुख असे नवीन अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
IIT, JEE, NEET, तत्सम परीक्षांच्या अभ्यासासाठी पालक वर्गाचा ओढा पाल्यांना कोटा, नांदेड, लातूर इत्यादी ठिकाणी पाठवण्याचा आहे. परंतु ग्रामीण व निमशहरी भागातील पालकांसाठी असे पर्याय खर्चिक आहेत. त्याचा विचार करून महाविद्यालयाने या परीक्षांच्या तयारीसाठी प्रताप पॅटर्न हा उपक्रम सुरू केलेला आहे. सन 2022 ते 2025 दरम्यानच्या काळात खानदेश शिक्षण मंडळाने काही लक्षणीय विकास कामे केली आहेत. विद्यमान संचालक मंडळांने विद्यार्थी केंद्रीत भूमिका ठेवून सातत्याने नवनवीन उपक्रम घेण्याचा प्रयत्न केला आहे व करीत आहेत. आजच्या स्पर्धेच्या काळात आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी हा स्पर्धेत टिकावा त्यासाठी अनेक महत्त्वाची पाऊले संस्थेने उचलली आहेत.
खानदेश शिक्षण मंडळाची जी वैभवशाली परंपरा आहे, ती प्रयत्नपूर्वक जपून ठेवावी हा मानस संस्थेचा राहिलेला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांची परिपूर्ती करताना दिसते. साधारणतः 33 हजार स्क्वेअर फिटमध्ये नव्या इमारतीची निर्मिती केली आहे. या इमारतीमध्ये जवळपास दोन मोठे व्याख्यान हॉल व 38 वर्ग खोल्यांची निर्मिती केली आहे. या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना अध्ययन, अध्यापन व संशोधनसाठी त्याची मदत होत आहे. संस्थेने आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्राचे (फार्मसी) शिक्षण मिळावे व त्यासाठी सुसज्ज इमारत व प्रयोगशाळा (लॅब) निर्माण करावी यासाठी संस्थेने बी. फार्मसीची इमारत अतिशय देखण्या स्वरूपात अद्यावत केली आहे.
सर्व शैक्षणिक सोयींची उपलब्धी असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांची या फार्मसी महाविद्यालयाला विशेष पसंती असते. याखेरीज बी.बी.ए व बी.सी.ए सारखे महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमाची सुरुवात करून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच औषधनिर्माण शास्त्रात पदव्युत्तर (एम.फार्म) अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी संस्था सतत तत्पर असते.
विशेष म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्फत नवीन एम.सी.ए चा (पदव्युत्तर) अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू केला आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे दूर जाण्याची आता आवश्यकता नाही. याशिवाय होऊ घातलेल्या नॅक साठी संस्था व महाविद्यालय स्तरावर जय्यत सुरू आहे. एकूणच खा.शि. मंडळांने आपली वैभवशाली परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *