लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे “मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रम”* *एचआयव्ही व क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी समुपदेशन सत्र ग्रामीण रुग्णालयात*
![]()
*लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे “मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रम”*
*एचआयव्ही व क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी समुपदेशन सत्र ग्रामीण रुग्णालयात*
अमळनेर प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे “Service Week – Mental Health & Well-Being” या सेवा सप्ताहांतर्गत एचआयव्ही व क्षयरोग (TB) ग्रस्त रुग्णांसाठी विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे पार पडले.
या सत्रात रुग्णांना मानसिक बळ देणे, आजाराविषयी योग्य माहिती देणे तसेच उपचारादरम्यान होणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. समुपदेशनाद्वारे रुग्णांना भावनिक आधार मिळतो, उपचार पाळण्यामध्ये सुधारणा होते तसेच समाजातील कलंक कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांचे सामाजिक व मानसिक आरोग्य सुधारते.
या सत्रात ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील, डॉ. प्रकाश तळे, डॉ. आशिष पाटील, एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शिंदे, आयुष विभागाचे डॉ. परेश पवार, आयसीटीसी समुपदेशक श्री. अश्वमेध पाटील व दीपक शेलार, एआरटी समुपदेशक श्री. जयेश मोरे, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. देवेंद्र मोरे, श्री. अजमल मणियार, क्षयरोग विभागाचे श्री. रमाकांत सैंदाणे व श्री. संदीप अहिरराव, तसेच नर्सिंग इन्चार्ज सौ. सुजाता वळवी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव लायन महेंद्र पाटील, खजिनदार लायन नितीन विचुंरकर, तसेच प्रकल्प अध्यक्ष लायन डॉ. प्रशांत शिंदे, लायन उदय शाह, लायन डॉ. युसुफ पटेल आणि लायन रुपेश मणियार यांनी केले.
रुग्ण व उपस्थितांनी या सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

