स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.*
1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी.*

जळगांव प्रतिनिधी

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती तिथि नुसार अश्विन पौर्णिमेला उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पूजा सायखेडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात रामायण या महाकाव्याची रचना 24000 श्लोक 7 कांड मध्ये विभागून महर्षि वाल्मिकीनी भारतीय संस्कृती, परंपरा, प्रेम, दया, करुणा, भक्ती, निष्ठा नैतिकता आणि आध्यात्मिक शिकवण संपूर्ण जगाला दिली अशी माहिती दिली. प्रा. गणेश सुर्यवंशी सरांनी आदिकवि वाल्मिकी यांच्या अलौकिक व्यक्तीमत्वातील प्रभावी घटक यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. संदिप वानखेडे, व समितीचे सदस्य प्रा. ज्योती सोनवणे, प्रा. दिपक चौधरी, प्रा. सुरेश शिंदे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *