निवडश्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा*
![]()
*निवडश्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा*
धुळे दिनांक 08
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दिनांक 02/06/2025 ते 12/06/2025 दरम्यान राज्यातील 12 वर्ष व 24 वर्ष सेवा झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षिका यांचे अनुक्रमे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण घेण्यात आले होते.
परंतु परीक्षा होऊन तीन महिने उलटून ही या शिक्षकांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे हे शिक्षक, शिक्षिका प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत होते. याबाबत राज्यभरातून अनेक शिक्षकांनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्याकडे याबाबत दाद मागितली होती. त्यामुळे नेहमीप्रमाणे शिक्षकांच्या हाकेला धावून जाणाऱ्या शुभांगी ताई पाटील यांनी याबाबत देखिल राज्याच्या शिक्षण संचालकांकडे पुणे येथे जाऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. पण तरीही प्रमाणपत्र वितरित न झाल्याने अखेर शुभांगी ताई यांनी तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे शुभांगी ताईंच्या या सतत च्या पाठ पुराव्या ची शासनाने दखल घेत राज्यातील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी शिक्षक, शिक्षकांना आता प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहेत.
केवळ शुभांगी ताई पाटील यांच्या व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या सततच्या पाठ पुराव्या मुळेच राज्यातील वरिष्ठ व निवड श्रेणी शिक्षक शिक्षकांना सदरचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे कोणतेही संविधानिक पद नसताना देखील शुभांगी ताई पाटील या शिक्षकांचे असंख्य कामे सतत करत असतात म्हणून शिक्षकां मधून शुभांगी ताई पाटील यांचे कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रमाणपत्र मिळालेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष पगारात वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी चा लाभ मिळवून देण्यासाठी शुभांगी ताई पाटील प्रयत्नशील आहेत.

