संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते*- डॉ.विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन. ———————————————— ●मराठी विभागाचा उपक्रम ●संत साहित्यातील पर्यावरण ●प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव यांची विशेष उपस्थिती
1 min read

संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते*- डॉ.विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन. ———————————————— ●मराठी विभागाचा उपक्रम ●संत साहित्यातील पर्यावरण ●प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव यांची विशेष उपस्थिती

Loading

*संत साहित्य मानवास निसर्गाशी एकरूप करते*- डॉ.विनोद ऊपर्वट यांचे प्रतिपादन.
————————————————
●मराठी विभागाचा उपक्रम
●संत साहित्यातील पर्यावरण
●प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव यांची
विशेष उपस्थिती

*अमळनेर प्रतिनिधी* : दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अंमळनेर आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात भाषा पंधरवाडा’ निमित्ताने अतिथी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत व्याख्यानमालेचा पहिला दिवस डॉ.विनोद ऊपर्वट (धुळे) यांच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे आयोजन पूज्य सानेगुरुजी सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत करण्यात आले होते. आपल्या प्रभावी व्याख्यानात डॉ.ऊपर्वट यांनी सांगितले की, “तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या युगातही संतांचे विचार आणि त्यांची पर्यावरण विषयक संवेदनशीलता आजही अत्यंत महत्त्वाची आहे.
संत साहित्यातील निसर्गदृष्टी ही माणसाला निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देते.” त्यांनी पुढे सांगितले की, संतांनी आपल्या अभंग, ओव्या आणि कीर्तनांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, ज्याची आजच्या काळात विशेष गरज आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच. डी. जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना संत साहित्यातील मूल्यांचा अभ्यास करून जीवनात त्यांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी विभागाचे प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी ‘अभिजात भाषा पंधरवाडा’ या उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट करीत मराठी भाषेच्या संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.गोपाल बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सागर सैंदाणे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. रमेश माने, डॉ.विलास गावित, प्रा.योगेश पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *