औषध निर्माता हा विश्वासार्ह दुवा -डॉ.अविनाश महाजन* ,[ गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल येथे प्रतिक्षालयात वाचनदिनी सुरु होणार हृदयरोग व नेत्ररोग संदर्भीय वाचनालय : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा अभिनव प्रेरक उपक्रम ]
1 min read

औषध निर्माता हा विश्वासार्ह दुवा -डॉ.अविनाश महाजन* ,[ गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल येथे प्रतिक्षालयात वाचनदिनी सुरु होणार हृदयरोग व नेत्ररोग संदर्भीय वाचनालय : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा अभिनव प्रेरक उपक्रम ]

Loading

*औषध निर्माता हा विश्वासार्ह दुवा आहे : डॉ.अविनाश महाजन*
[ गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल येथे प्रतिक्षालयात वाचनदिनी सुरु होणार हृदयरोग व नेत्ररोग संदर्भीय वाचनालय : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचा अभिनव प्रेरक उपक्रम ]

 

जळगाव :” औषध निर्माता हा विश्वासार्ह दुवा आहे.” असे प्रतिपादन डॉ. अविनाश महाजन ( माजी प्राचार्य होमिओपॅथिक कॉलेज जळगाव ) यांनी केले. दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक औषध निर्माता दिन रामानंदनगर , जळगाव येथील सिद्धी मेडिकल येथे साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना डॉ. महाजन बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी पुंडलिक राणे ( अध्यक्ष, स्वामी रामानंद वाचनालय ), मातोश्री शांतीदेवी रानवे, मतीम तडवी उपस्थित होते. प्रस्तावनेत संयोजक विजय लुल्हे ( संस्थापक अध्यक्ष व जिल्हा प्रमुख भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव ) यांनी औषध निर्मिती संशोधन आणि औषध हे लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या फार्मसी व्यवसायातील फार्मासिस्ट यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना सत्कारित करणे आपले कर्तव्य आहे असे सांगितले.रुग्ण औषधी खरेदी करतांना फार्मासिस्टांवर जो विश्वास दाखवतात त्या अनुषंगाने प्रतिमा जपत तत्वनिष्ठेने सचोटीपूर्वक व्यवसाय करावा असे विनम्र आवाहन फार्मासिस्ट यांना केले.
जागतिक औषध निर्माता दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे डॉक्टर अविनाश महाजन यांच्या हस्ते सिद्धी मेडिकल्सचे संचालक शैलेंद्र भदादे यांचा शाल, श्रीफळ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे पुस्तक देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. भदादे यांचे सहकारी मुकेश वालेचा यांचा सत्कार पुंडलिक राणे ( अध्यक्ष, स्वामी रामानंद वाचनालय ) यांच्या हस्ते तसेच पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष विजय लुल्हे यांच्या हस्ते शिवालिक मेडिकल्सचे संचालक अभय खांदे [ जिल्हा समन्वयक, मन:शक्ती केंद्र ] यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी पुंडलिक राणे मार्गदर्शनात म्हणाले की , ‘ सकारात्मक संबंध, योग्यता कौशल्य आणि सातत्य या तीन गोष्टींमुळे फार्मासिस्टचे योगदान अतुलनीय असते. कोविड महामारीत चाचणी घेणे आणि लसीकरणाची कार्यवाही ही अतुलनीय कार्ये फार्मासिस्टांनी जीवाची पर्वा न करता केली असे सांगितले .
फार्मासिस्ट अभय खांदे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की , ” फार्मसी : आपल्या आरोग्यासाठी नेहमीच विश्वासार्ह आहे. ” खांदे यांनी आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट फेडरेशन ( FIP ) संस्थेच्या स्थापनेचा इतिहास सांगून जागतिक औषध दिन वर्ष २०२५ ची संकल्पना सांगितली.रुग्णांना फक्त औषधांमुळे फरक न पडता तितक्याच प्रखरतेने विश्वास, प्रेम व आपुलकी दाखविल्याने त्यांचे आरोग्य व जीवनशैली झपाट्याने बदलते.’ सत्कारार्थी फार्मासिस्ट मुकेश वालेचा मनोगतात म्हणाले की, ‘ राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये पहिल्या पाच सर्वाधिक व्यवसायिकांमध्ये शिक्षक व शास्त्रज्ञ यांच्याबरोबर फार्मासिस्टचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘ सत्कारार्थी फार्मासिस्ट शैलेंद्र भदादे यांनी मनोगतात जगातील ड्रग्स समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांमध्ये गुंतवणूक करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. तसेच फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची महत्वपूर्ण कार्ये सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय लुल्हे यांनी केले. कार्यक्रमास सचिन चौधरी, अमन पिंजारी, रहमान पिंजारी, प्रवीण मेहता, श्याम पाटील उपस्थित होते .
*हृदयरोगतज्ञांचा सत्कार*
जागतिक हृदयदिन निमित्ताने भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे हृदयरोग तज्ञ डॉक्टर विवेक चौधरी यांचा सत्कार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यशवंत ठोसरे साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन करण्यात आला त्यावेळी डांभुर्णी ग्रामपंचायतचे माजी सरपंच शितल चौधरी व संयोजक विजय लुल्हे उपस्थित होते.पुस्तक भिशीचे संस्थापक विजय लुल्हे यांनी डॉक्टर विवेक चौधरी व नेत्रतज्ञ अंजली चौधर यांचेशी वाचन चळवळ जनसामान्यात वर्धिष्णू करण्यासाठी साधक – बाधक चर्चा करून विनंती केली की , ‘ रुग्णालयात हृदयरोगी औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी येतात त्यावेळी नंबर लागेपर्यंत प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांना ,सोबत आलेल्या नातेवाईकांना प्रतिक्षा कालावधीत हृदयरोग व नेत्रविकार संदर्भात – विकार का उद्भवतात, कोणते औषधोपचार घ्यावेत, कोणते व्यायाम करावेत, गृहिणींनी जेवण देतांना पथ्य लक्षात घेता कोणते अन्न द्यावे या संदर्भात वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. वाचनातून निव्वळ वेळेचा सदुपयोग न होता कुतूहलपूर्वक ज्ञानार्जन होईल.परिणामी रुग्ण व गृहिणी आहार विहार व योगोपचार स्वयंप्रेरणेने करण्यात प्रवृत्त होतील तसेच मानसिक दृष्टयाही सक्षम होतील. डॉ. विवेक चौधरी व त्यांच्या बंधुनी विनंती नुसार औषधोपचार संदर्भीय उपयुक्त पुस्तके लवकरात लवकर दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी वाचनदिनी उपलब्ध करून दिले जातील याचे आश्वासन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांना दिले.
हार्ट प्लस हॉस्पिटलचे संचालक हृदयरोग तज्ञ डॉ. संदीप भारुडे यांचा भावपूर्ण सत्कार विजय लुल्हे यांनी शाल, श्रीफळ व ग्रंथ देऊन केला.सत्कार प्रसंगी असिस्टंट डॉक्टर सारंग चौधरी तसेच तुषार चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *