आमदार अमोल पाटील यांचा ‘मराठा समाजभूषण पुरस्कार’ -उदया अमळनेरात भव्य सत्कार सोहळा
1 min read

आमदार अमोल पाटील यांचा ‘मराठा समाजभूषण पुरस्कार’ -उदया अमळनेरात भव्य सत्कार सोहळा

Loading

आमदार अमोल पाटील यांचा ‘मराठा समाजभूषण पुरस्कार’ –उदया अमळनेरात भव्य सत्कार सोहळा

अमळनेर प्रतिनिधी –
पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा जनतेचे लाडके नेते दादासाहेब अमोल चिमणराव पाटील यांना ‘मराठा समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. हा भव्य सत्कार सोहळा उदया रविवार, दि. 05 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता अमळनेर येथील शिवसेना कार्यालयाजवळ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या सोहळ्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील आणि शिवसेना शहर प्रमुख संजय कौतिक पाटील (भूत बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला वेग आला असून, पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शिवसेना तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवासेना तसेच सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आमदार अमोल दादांचा भव्य सत्कार, स्वागत सोहळा आणि मराठा समाजाच्या योगदानाचा गौरव यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
जय महाराष्ट्र या घोषणांनी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीने हा सोहळा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास तालुका प्रमुख सुरेश पाटील व शहरप्रमुख संजय पाटील व आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *