सेवा सप्ताह निमित्ताने वृक्षारोपण ,खाऊ वाटपचे कार्यक्रम
![]()
सेवा सप्ताह निमित्ताने वृक्षारोपण ,खाऊ वाटपचे कार्यक्रम
पुणे उरुळी कांचन: भारताचे यशस्वी प्रधानमंत्री पूज्यनीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संत यादव बाबा हायस्कूल येथील जागेत व शिंदवणे घाट, येथे ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक हिंदू रत्न पुरस्कार विजेते डॉ.रवींद्र भोळे यांचे सहकार्याने वृक्ष वाटप , वृक्षारोपण करण्यात आले. तसेच येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संत यादव बाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कांचन सर, संचालिका सौ विद्याताई यादव, शिंदवणे गावच्या माजी सरपंच सारिका ताई महाडिक, निर्मलाताई महाडिक, ओम राजे महाडिक, शंकर जराड, शाळेचे विद्यार्थी ,शिक्षक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संत यादव बाबा स्कूलचे सल्लागार सदस्य ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे महाराज संस्थापक अध्यक्ष डॉ मणी भाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सरकारने सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. हा कार्यक्रम देशाचे यशस्वी पंतप्रधान पूजनीय नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्ताने असून नरेंद्र मोदीजी म्हणजे देशाचे तारणहार असून परमेश्वराने योग्य वेळी राष्ट्रहितासाठी मनुष्य रूपात परमेश्वराचे प्रगटीकरण केलेले आहे. गीतेमध्ये चौथ्या अध्यायामध्ये सातव्या व आठव्या श्लोकामध्ये पृथ्वीतलावर प्रगटीकरण का होते हे विशद केलेले आहे. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो ,अधर्म, अनिती ,अन्याय यांची वाढ होते, तेव्हा परमेश्वर आपले मनुष्य रूपात आकार घेऊन जन्म घेतो, धर्माची पुनरुत्थापना करण्यासाठी व सज्जनांच्या उद्धारासाठी ,पाप करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी ,हे मनुष्य रूपात प्रगटीकरण असते. भारत देशाला ग्लानी आली असता, देशामध्ये अन्याय ,अत्याचार ,अधर्म ,अनिती यांची वाढ झाली असता योग्य वेळी परमेश्वराने पूज्य नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने परमेश्वराचे प्रगटीकरण मनुष्य रूपात झालेले आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी आपल्या देशाचा दबाव जगामध्ये वाढवला व देशाला एक उंची प्राप्त करून दिली. त्याचप्रमाणे देशामध्ये धर्माची धारणा करून, भ्रष्टाचारचे निर्मूलन करून अनेक प्रकल्प उभे केलेले आहेत. मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताह चे आयोजन करणे म्हणजे त्यांच्या कार्या प्रति कृतज्ञ राहणे होय. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

