सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँग्रेसचा PWD कार्यालयावर धडक मोर्चा!,  ‘लेखी पत्र घेतल्याशिवाय उठणार नाही’ — ठिय्या आंदोलनाने प्रशासनाची धावपळ; अखेर काम लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन!
1 min read

सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँग्रेसचा PWD कार्यालयावर धडक मोर्चा!, ‘लेखी पत्र घेतल्याशिवाय उठणार नाही’ — ठिय्या आंदोलनाने प्रशासनाची धावपळ; अखेर काम लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन!

Loading

सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँग्रेसचा PWD कार्यालयावर धडक मोर्चा!

‘लेखी पत्र घेतल्याशिवाय उठणार नाही’ — ठिय्या आंदोलनाने प्रशासनाची धावपळ; अखेर काम लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन!

अमळनेर/धरणगाव प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील पिंप्री ते पिंपळेसीम या अवघ्या सव्वातीन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न तब्बल सहा ते सात महिन्यांपासून रखडला असून, प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात आज काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले.

आज दि. ३१ ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्याने उपकार्यकारी अभियंत्यांच्या दालनातच अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली.

या आंदोलनात धरणगाव शहर काँग्रेसचे नेते श्री. सुनील सोनार आणि धरणगाव तालुका काँग्रेसचे नेते शेख बशीर उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमळनेर काँग्रेसचे नेते श्री. संदीप घोरपडे, अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. भागवत सूर्यवंशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. भागवत गुरुजी तसेच अमळनेर तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष श्री. राजू भाट ,डॉक्टर व्ही डी पाटील काँग्रेस कार्यकर्ता पाळधी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव
यांनी आंदोलनस्थळी येत पूर्ण वेळ ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.

२५ ते ३० गावांतील नागरिकांचा जीवघेणा प्रवास!

पिंप्री-पिंपळेसीम रस्त्याचे डांबरीकरण रखडल्याने धरणगाव तालुक्यातील तब्बल २५ ते ३० गावांतील नागरिकांना खडीच्या खडबडीत रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, खडी आणि सततच्या कंपनामुळे नागरिकांच्या शरीरावर परिणाम होत असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या रस्त्याच्या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धरणगाव कार्यालयातील अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर अमळनेर येथील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली, अशी संतप्त भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

लेखी पत्राशिवाय उठणार नाही!’

आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “रस्त्याचे काम करण्याबाबत लेखी पत्र मिळाल्याशिवाय येथून उठणार नाही.”

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपकार्यकारी अभियंता, अमळनेर यांनी धरणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर पिंप्री ते पिंपळेसीम रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात येईल, असे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.

लेखी आश्वासन हातात पडल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

अवघ्या सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी नागरिकांना सहा-सात महिने प्रतीक्षा करावी लागणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता लेखी आश्वासनानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याकडे २५ ते ३० गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *