प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर येथे एक दिवसीय गांधी विचार शिबिर,  हनुमंत पवार पुणे यांचे विशेष व्याख्यान
1 min read

प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर येथे एक दिवसीय गांधी विचार शिबिर, हनुमंत पवार पुणे यांचे विशेष व्याख्यान

Loading

प्रताप तत्वज्ञान केंद्र अमळनेर येथे एक दिवसीय गांधी विचार शिबिर,

हनुमंत पवार पुणे यांचे विशेष व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी

महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्र , विचारधारा
प्रशाळा , राष्ट्रीय सेवा योजना विभाग,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
एक दिवसीय गांधी विचार शिबिर
04 ऑक्टोबर 2025, शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे उद्घाटन संपन्न झाले .
प्रतिमा पूजन उद्घाटन विचारधारा प्रशाळा संचालक प्रोफेसर डॉ .म. सु पगारे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक
डॉ.व्हि.एम रोकडे, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच डी जाधव, मानद संचालक डॉ ओसवाल, प्रमुख अतिथी व वक्ते हनुमंत पवार यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा मनोज इंगळे यांनी केले. प्रमुखअतिथी हनुमंत पवार यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रबोधन केले.
विचारधारा प्रशाळा संचालक प्रोफेसर डॉ म . सु. पगारे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वयंसेवक अमळनेर प्रताप महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, धनदाई महाविद्यालय, मारवड महाविद्यालय यांचा सहभाग होता.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ हेमंत पवार, प्रा डॉ महादेव तोंडे, प्रा डॉ पारधी, प्रा विजयकुमार वाघमारे, प्रा धनराज ढगे, प्रा सुनील राजपूत, प्रा प्रियांका पाटिल, प्रा कांबळे, प्रा डॉ अनिता खेडकर, डॉ अस्मिता सर्वैया यांनी सहभाग नोंदवला.
शिबिर समन्वयक म्हणून प्रताप महाविद्यालय अमळनेरचे कार्यक्रम अधिकारी प्रा हेमंत पवार यांनी भूमिका पार पाडली.
सूत्र संचलन प्रा दीपक खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक डॉ व्हि. एम. रोकडे यांनी व्यक्त केले. राष्ट्र गीताने शिबिराची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *