कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित
1 min read

कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित

Loading

कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित

धुळे प्रतिनिधी
धुळे महानगरपालिका शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक संजय खलाणे सर यांच्या कन्या कु. मोहिनी खलाणे हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर पुणे विद्यापीठात सुवर्णयश संपादन केले आहे.
सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले, तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले.
या यशस्वी क्षणी तिच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले होते तर आईवडिलांच्या त्याग व प्रोत्साहनाची आठवण तिने कृतज्ञतेने व्यक्त केली.
या यशाबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलासराव पाटील, महानगरपालिका हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रुपेश कुलकर्णी सर, तसेच सर्व शिक्षक–कर्मचारी यांनी मोहिनीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
धुळेकरांसाठी हा क्षण म्हणजे खऱ्या अर्थाने अभिमानाचे सुवर्णपान ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *