भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची एच.आर.ए. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
![]()
भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची एच.आर.ए. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी –
अमळनेर तालुक्यातील जैतापूर ग्रामचे सुपुत्र, भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्यातील एच.आर.ए. (हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सेवाभाव, सामाजिक कार्य आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेची दखल घेत संघटनेच्या वतीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या निमित्ताने संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित आजाद तिवारी (पौत्र – अमर शहीद चंद्रशेखर आजाद) यांनी अधिकृत निवेदन जारी करताना सांगितले की, “श्रीमान् कमलेश कुलकर्णी यांच्या रूपाने महाराष्ट्रात राष्ट्रसेवेचा नवा अध्याय सुरू होईल. त्यांच्या कार्यातून युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ होईल, अशी आम्हाला खात्री आहे.”
कमलेश कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच एक मोठे कर्तव्य आहे. संघटनेचे उद्दिष्ट राष्ट्रसेवा आणि सामाजिक कार्य आहे. या पदावर राहून मी सदैव राष्ट्रहित आणि जनकल्याणासाठी कार्यरत राहीन.”
गावातील नागरिक, मित्रपरिवार आणि समाजातील विविध घटकांनी या नियुक्तीबद्दल कमलेश कुलकर्णी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या निवडीमुळे अमळनेर तालुक्याचे आणि जळगाव जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.

