जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज- मुकुंद सपकाळे
![]()
जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज-
मुकुंद सपकाळे
भारतीय संविधानाच्या गेल्या ७५वर्षाचा ऐतिहासिक असा प्रगतीचा विचार लक्षात घेता आजही जनतेला संविधान साक्षर होण्याची आवश्यकता असून यासाठी प्रशासनिक अधिकारी अभ्यासक यांनी जनतेत संविधानाचे महत्त्व लोकशाहीचे महत्त्व रुजविण्याची खरी गरज असल्याचे मत संविधान सन्मान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी तर स्वागताध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांनी संमेलनाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले प्रा. डॉ. सत्यजित साळवे, ज्येष्ठ समीक्षक जयसिंग वाघ यांनी संमेलनाच्या संदर्भात माहिती विषद केली. मनोहर गाढे,सुरेश चांगरे, भगवान बाविस्कर, सुभाष सपकाळे, एडवोकेट राजेश गोयर, गणेश सुरवाडे, विनोद रंधे, चेतन नन्नवरे, प्राचार्य एस. एस. राणे रमेश सोनवणे, प्रा. किशोर हिरोळे, गोपाळ भालेराव, सोमा भालेराव, दत्तू सोनवणे, चंद्रशेखर अहिराव, साहेबराव बागुल, नारायण सोनवणे, दिलीप सपकाळे, अशोक सपकाळे, वाल्मिक जाधव, श्रीकांत बाविस्कर यांनी संमेलन यशस्वीतेच्या दृष्टीने सूचना मांडल्या. संविधान संमेलनामध्ये विविध समित्यांचे नियोजन करून कार्यरत कराव्यात यासंदर्भात राजू मोरे, अनिल सुरडकर, विजयकुमार मौर्य, सुनील सोनवणे, डी.एम. भालेराव, राजू सोनवणे,विलास सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला.सूत्र संचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार प्रा.प्रीतीलाल पवार यांनी मानले.


