के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा*
![]()
*के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा*
दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित शाळा के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाचे आयोजन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांनी केले.
त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून दसरा हा सण आपल्या जीवनात विजयाची, समर्पणाची आणि एकात्मतेची प्रेरणा देतो. या सणाच्या निमित्ताने आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करुन सकारात्मकतेकडे वळायला हवे.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. सोपान इंगळे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्याने हा उपक्रम छान झाला. त्यांनी दसरा सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापिका मा.सौ.रसिका घागस मॅडम यांनी देखील शुभेच्छा दिल्या.तसेच पर्यवेक्षक मा.श्री.सुनिल मोरे सर व पर्यवेक्षिका सौ.मनिषा पटेल मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना दसरा सणा बद्दल माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचाआनंद घेतला.तसेच यावेळी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या व स्वागत करतांना पुष्पगुच्छ न देता वर्तमानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनतर विविध वर्गात देखील वर्तमानपत्राचें वाचन करुन घेण्यात आले. या दसऱ्याच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांचे विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वागत केले.दसरा सणाच्या सर्व शिक्षक बंधू व भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

